हमासनंतर इस्रायलचा आता हिजबुल्लाहवर हल्ला! लेबनॉनमध्ये केलेल्या हल्ल्यात 30 ठार, हिजबुल्लाह कमांडरचाही मृत्यू

इस्त्रायली सैन्याने सांगितले की त्यांनी सोमवारी हिजबुल्लाच्या दोन स्थानांवर हल्ला केला. या तळांवरून हिजबुल्लाचे दहशतवादी इस्रायलवर रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे आणि रॉकेट डागण्याचा कट रचत होते. इस्रायलने सोमवारी गाझामधील अनेक लक्ष्यांवर हल्ले केले. पॅलेस्टिनी मीडियानुसार या हल्ल्यांमध्ये 30 जणांचा मृत्यू झाला आहे.

    हमासनंतर इस्रायलन (Israel Hamas War)  आता लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या लक्ष्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलने गाझामधील हमासच्या स्थानांवर आणि दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या स्थानांवर हल्ले केले. या हल्ल्यात लेबनॉनमधील हिजबुल्लाह कमांडर ठार झाला. हिजबुल्लाशी संलग्न असलेल्या अल-मनार टीव्हीने हा दावा केला आहे. याआधी इस्रायलने हमासच्या तोफखानाचा डेप्युटी कमांडर मुहम्मद कटमाश याला ठार केले होते.

    इस्त्रायली सैन्याने सांगितले की त्यांनी सोमवारी हिजबुल्लाच्या दोन स्थानांवर हल्ला केला. या तळांवरून हिजबुल्लाचे दहशतवादी इस्रायलवर रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे आणि रॉकेट डागण्याचा कट रचत होते.

    इस्रायलने सोमवारी गाझामधील अनेक लक्ष्यांवर हल्ले केले. पॅलेस्टिनी मीडियानुसार या हल्ल्यांमध्ये 30 जणांचा मृत्यू झाला आहे. पॅलेस्टिनी मीडियाच्या मते, इस्रायलने तीन रुग्णालयांजवळ बॉम्बफेक केली आहे. मात्र, या हल्ल्यांमध्ये रुग्णालयांचे नुकसान झाले की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हॉस्पिटलजवळ बॉम्बस्फोट झाल्याच्या वृत्तावर इस्रायली लष्कराकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

    7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे

    इस्रायल आणि हमास यांच्यात 7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हजारो रॉकेट डागले. एवढेच नाही तर हमासच्या सैनिकांनी सीमा भागात घुसून इस्रायली सैनिक आणि नागरिकांवर हल्लेही केले होते. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 1400 लोक मारले गेले आहेत. त्याचवेळी, या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायल गाझा पट्टीतील हमासच्या स्थानांवर बॉम्बफेक करत आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 4600 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याच वेळी, 10 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.