इस्त्रायलचा इराणवर मोठा हल्ला (फोटो -istockphoto)
इस्त्रायल आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. इस्त्रायलने इराणच्या आण्विक शक्ती नष्ट करण्याचा जणू विडाच उचलला आहे. अमेरिका इस्त्रायलच्या तर इराणच्या बाजूने रशिया असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान इराणने इस्त्रायलवर हल्ला करत चोख प्रत्युत्तर दिले आहे. मात्र याकहा बदला इस्त्रायलने घेतला आहे. इस्त्रायल सातत्याने इराणच्या परमाणु असलेल्या ठिकाणांवर हल्ला करत आहे. यामुळे इराणचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
इराणने इस्त्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर बदला घेण्यासाठी इस्त्रायलने आपली 60 लढाऊ विमाने थेट इराणमध्ये घुसवली आहेत. या विमानांनी इराणच्या अनेक महत्वाच्या भागात नुकसान केले आहे. इस्त्रायलच्या लढाऊ विमानांनी इराणचे मोठे नुकसान केले आहे. इस्त्रायलचि लढाऊ विमाने रात्रभर इराणमध्ये धुमाकूळ घालत होते.
इस्त्रायलच्या विमानांनी इराणच्या सैन्य ठिकाणे आणि महत्वाच्या भागात मोठे हल्ले केले. तेहरानमध्ये भीषण हल्ले करण्यात आले. औद्योगिक क्षेत्र, संरक्षण क्षेत्र आणि अन्य महत्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. अण्वस्त्र संबंधित काही ठिकाणी इस्त्रायल वायुसेनेने प्रचंड मोठे हल्ले केले. जवळपास 120 बॉम्ब आणि शेकडो मिसाईल्स या हल्ल्यासाठी वापरण्यात आली.
इराणने इस्त्रायलवर हल्ला करण्यासाठी काही ड्रोन पाठवली होती, ती इस्त्रायल सैन्याने उडवून लावली आहेत. इस्त्रायल वायुसेनेने इराणच्या शस्त्र निर्मितीत मदत करणाऱ्या संस्थेवर देखील मोठा हल्ला केला आहे. इराण आणि इस्त्रायलमध्ये वाढत असलेल्या तणावामुळे जगभरातील देश चिंतित झाले आहेत. आण्विक विषयावर चर्चा व्हावि यासाठी अनेक राजकीय मंडळी आणि मोठे देश प्रयत्न करत आहेत.
इराणमध्ये भोपाळ गॅस दुर्घटनेपेक्षा जास्त हानी होणार
इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. दोन्हीही देश एकमेकांवर मोठे हल्ले करत आहे. इस्त्रायलने इराणच्या अणूभट्टीवर देखील मोठा हल्ला केला होता. मात्र आता इराणच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिकेने देखील उडी घेतली आहे. इराणने बिनशर्त आत्मसमर्पण करावे असे अमेरिकेचे म्हणणे आहे.
जर का अमेरिकेने आपला सर्वात शक्तिशाली असा बंकर बस्टर बॉम्बने इराणवर हल्ला केला तर इराणमध्ये प्रचंड मोठी हानी होऊ शकते. हा बॉम्ब जर इराणच्या न्यूक्लिअर यंत्रणा असलेल्या ठिकाणी टाकला गेल्यास इराणमध्ये प्रचंड जीवितहानी होऊ शकते. काही तज्ञांच्या मते असे झाल्यास भारतात झालेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेपेक्षा अधिक नुकसान इराणमध्ये होऊ शकते.
आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जाचे राफेल ग्रोसी यांनी सांगितले की, अण्वस्त्र यंत्रणा असलेल्या ठिकाणी हल्ला झाल्यास याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. क्षेत्रीय आणि आंतराष्ट्रीय सुरक्षेवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. इस्त्रायलने फोर्डॉवर या आधी देखील एक मोठा हल्ला केला आहे. त्यामध्ये इराणची अण्वस्त्र यंत्रणा नष्ट करण्यात पूर्ण यश इस्त्रायलला आले नाही.