अमेरिकेन सैन्याचा व्हेनेजुएलाच्या ड्रग्ज कार्टेलवर हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता आदेश (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Donald Trump on Venezuela : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत चर्चेचा विषय बनत असतात. कधी त्यांच्या निर्णयांमुळे ते जगाला धक्का देतात, तर कधी आंतरराष्ट्रीय राजकारणातील त्यांच्या विधानांनी. गेल्या काही काळात त्यांनी अनेक देशांबाबत असे निर्णय घेतेले आहेत किंवा अशी विधाने केली आहेत ज्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या काही काळापासून ते पाचहून अधिक देशांमध्ये युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे उत्तर अमेरिकन देश व्हेनेझुएलाशी युद्ध छेडले आहे.
नुकतेच त्यांनी अमेरिकन लष्कराने व्हेनेझुएलाच्याा एका ड्रग्ज तस्करी बोटीवर हल्ला केला असल्याचे म्हटले आहे. हा गेल्या आठवड्यात दुसरा हल्ला असून यामध्ये तीन लोक मारले गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरुन याची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, माझ्या आदेशानुसार, अमेरिकन सैन्याने आज साउथकॉम परिसरात एका हिंसक ड्रग्ज कार्टेल आणि त्याची तस्करी करणाऱ्या लोकांनावर हल्ला केला आहे.
Donald Trump यांचा यू-टर्न; अमेरिकेत Tik Tok वर बंदी नाही, चीनसोबत केला करार
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, या टोळा अमेरिकेत ड्रग्ज तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला, परराष्ट्र धोरमाला आणि अमेरिकेच्या हिंताना धोका निर्माण झाला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर हल्ल्याचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये एका जहाजाला लक्ष्य करण्यात आल्याचे दिसून यते. यापूर्वी २ सप्टेंबर रोजी देखील व्हेनेझिएलातून ड्रग्ज वाहून नेणाऱ्या जहाजावर हल्ल्याचे आदेश दिले होते. ज्यामध्ये ११ लोक ठार झाले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी या लोकांचे वर्णन ट्रेन डी अरागुआ ड्रग्ज दहशतवादी असे केले होते.
व्हेनेझुएलाकडून टीका
दरम्यान व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरा यांनी अमेरिकेच्या पहिल्या हल्ल्यावर टीका केली आहे. अमेरिकेच्या हल्ल्याला बेकायगेशीर म्हटले असून डोनाव्ड ट्रम्प यांच्यावर ड्रग्ज तस्करीचे खोटे दावे केल्याचा आरोप केला आहे. असे करुन ट्रम्प व्हेनेझुएलात राजवट बदलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आमच्या देशात कोणत्याही प्रकारच्या ड्रग्जचे उत्पादन केले जात नाही. पण पुन्हा झालेल्या हल्ल्यावर अद्याप व्हेनेझुएलाकडून कोणतेही विधान आलेले नाही.
दरम्यान सोमवारी (१५ सप्टेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांनी आता अमेरिकेसोबत संवाद होणार नसल्याचे म्हटले आहे. यासाठी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना जबाबदार धरले आहे. अमेरिकेच्या कारवाया चिथावणी देणाऱ्या असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. पण व्हेनेझुएला शांततेने समस्या हातळत असल्याचे मादुरो यांनी म्हटले आहे.
अमेरिकेन सैन्याने कुठे आणि का केला हल्ला?
अमेरिकेनच्या सैन्याने साउथकॉम परिसरात व्हेनेझुएलाकडून येणाऱ्या एका बोटीवर हल्ला केला आहे, कारण याबोटीवरुन ड्रग्ज तस्करी केली जात असल्याचे सांगितले जात आहे?
अमेरिकेच्या हल्ल्यावर व्हेनेझुएलाची प्रतिक्रिया काय होती?
व्हेनेझुएलाच्या बोटीवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यावर अद्याप कोणतेही प्रतिक्रिया आलेली नाही, पण यापूर्वी २ सप्टेंबर रोजी झालेल्या हल्ल्याला अध्यक्ष मादुरो यांनी बेकायदेशीर म्हटले आहे.
‘हे जगासाठी धोकादायक…’ ; एलॉन मस्क यांच्या संपत्तीवर जागतिक ख्रिश्चन धर्मगुरु पोप लिओ यांची टीका