मध्य पूर्वेत तिसरे महायुद्ध भडकणार? इराणच्या प्रतिहल्ल्याच्या भीतीने तेहरान जवळच्या अमेरिकन तळांना सतर्कतेचा इशारा (फोटौ सौजन्य: सोशल मीडिया)
US Strike on Iran : वॉशिंग्टन: मध्य पूर्वेत सध्या विनाशाचे संकट उभे राहिले आहे. इराणच्या अणुकेंद्रावर अमेरिकेने हल्ला केला आहे. यामध्ये इराणच्या फोर्डो, नतान्झ, इस्फाहान या तळांना उद्ध्वस्त करण्यात आले आहे. याच वेळी इराणने अमेरिकेच्या हल्ल्याला बेकायदेशीर म्हटले आहे. तसेच प्रतिहल्ल्याचीही धमकी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी मध्य पूर्वेतील अमेरिकन तळांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
इराण वगळता मध्य पूर्वेत अमेरिकेचे लष्करी आहेत. यातील ९ तळ इराणच्या अगदी जवळ आहेत. यामुळे इराणच्या प्रतिघाताची शक्यता पाहता अमेरिकेने इराणच्या आसपासच्या परिसरातील आपल्या लष्करी तळांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. सध्या मध्य पूर्वेत अमेरिकेते ५० हजार सैन्य तैनात आहेत. ही संख्या देशाबाहेर तैनात असलेल्या सर्व अमेरिकन सैन्याच्या एक तृतीयांश आहे. इराक, बहरीन, कुवेत, युएई, सीरिया, जॉर्डन, सौदी अरेबिया आणि ओमानमध्ये अमेरिकेचे सैन्य तैनात आहे. या तळांवर इराण हल्ला करण्याची शक्यता आहे.
#US MILITARY PRESENCE IN THE MIDDLE EAST
❗️Around 50,000 US troops are currently stationed in the #MidEast, making up nearly a third of ALL US forces deployed outside the country.
🇰🇼🇶🇦🇧🇭 The majority are based in #Kuwait, #Qatar, and #Bahrain. pic.twitter.com/iMOMUNkxZ1
— Emeka Gift Official (@EmekaGift100) June 21, 2025
ट्रम्प प्रशासनाने मद्य पूर्वेतील लष्करी तळांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. सर्वात जास्त धोका इराकजवळील लष्करी तळांना आहे. यामुळे येथे कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी अमेरिकेन आपले बरेच सैन्य इराकमधून परत बोलावून घेतले होते. याशिवाय इराकमधील अमेरिकन दूतावासतही सैन्य तैनात करण्यात आले आहे. इराणकडून अमेरिकेच्या हल्ल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या मध्य पूर्वेत मोठ्या विनाश घडण्याची शक्यता आहे.
याच वेळी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेविरोधात इराणने कोणतेही कारवाई केल्यास प्रत्यत्तर दिले जाईल. आजा जे पाहिले त्यापेक्षाही जास्त ताकदीने हल्ले केले जातील असेल त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर ही पोस्ट केली आहे.
याच दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायलावर सुमारे ३० क्षेपणास्त्रांचा मारा इराणने केला आहे. यामुळे सध्या तेल अवीव मध्ये मोठ्या विनाशाची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची देखील रशियाला पुतिन यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. यामुळे रशियाचीही युद्धात एन्ट्री होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.