ईशनिंदा कायद्याच्या नावाखाली पाकमध्ये अल्पसंख्याकांवर अन्याय? अमेरिकेच्या अहवालात शाहबाज सरकारचा खोटेपण उघड (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दिल्ली आणि इस्लामाबाद स्फोटावर अमेरिकेचा दुहेरी चेहरा ; पाकिस्तानसाठी सहानुभूती, भारतावर मौन
आता पाकिस्तान आणखी एका मुद्यावर अपमानित झाला आहे. पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळात ईशनिंदा कायद्याच्या नावाखाली अल्पसंख्यिक नागरिकांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहे. यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरच नव्हे, तर आता अमेरिकेने देखील फटकारले आहे.
अमेरिकेच्या (America) अहवालानुसार, पाकिस्तानमधील हिंदू, सिख, आणि ईसाई समुदायांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तान सरकारकडून या नागरिकांवर भेदभावपूर्व वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहात यावर प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले आहे. यामुळे पाकिस्तानचे शाहबाज सरकार पुन्हा जगासमोर अपमानित झाले आहे.
अमेरिकेच्या वरिष्ठ सिनेटमध्ये परराष्ट्र मंत्रालय समितीचे अध्यक्ष जिम रिश्च यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान सरकार ईशनिंदा कायद्याचा गैरवापर करत आहे. या कायद्याच्या नावाखाली अल्पसंख्यांक समुदांयावर भेदभावपूर्ण धोरणे राबवून अत्याचार केला जात आहे. त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने लादली जात आहे. या कायद्याच्या नावाखाली पाकिस्तानमध्ये मॉब हिंसाचार, द्वेषपूर्ण भाषणे, विनाकारणी अटक आणि जबरदस्तीचे धर्मांतरण घडवून आणले जात आहे. यामुळे पाकिस्तानमधील अल्पसंख्याक लोकांमध्ये भीती वाढत आहे.
The Pakistani government continues to suppress religious freedom for minority groups by imposing blasphemy law and other discriminatory policies. An atmosphere of intolerance including mob violence, hate speech, arbitrary arrests, and forced conversions often remains unchecked. — Senate Foreign Relations Committee Chairman (@SenateForeign) November 25, 2025
दरम्यान यापूर्वी पाकिस्तानमधील मानवाधिका संघटना स्ट्रीट ऑफ फियर : फ्रिडम ऑफ रिलिजन ऑर बिलीफने देखील पाकिस्तानवर अल्पसंख्यिकी लोकांवर अत्याचार केल्याचे आरोप केले होते. संघटनेने म्हटले होते की, पाकिस्तानमधील अहमदिया, हिंदू, आणि ईसाई समुदायंविरोधात ईशनिंदा कायद्याच्या आरोपाखाली भेदभावपूर्ण वागणूक दिली जात आहे.
तसेच त्यांच्यावरील हल्ल्यांमध्ये देखील वाढ झाली आहे, त्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून अटक करण्यात येत आहे. तसेच अल्पवयीन अल्पसंख्याक हिंदू आणि ईसाई मुलींचे जबरदस्तीने धर्मांतरण केले जात आहे. त्यांचा मुस्लिम समाजात
विवाह लावून दिला जात आहे.
US PAK Deal : पळपुट्या पाकिस्तानवर अमेरिकेच्या वरदहस्त; दहशतवादी पाळणाऱ्यांना देणार AMRAAM मिसाईल






