Bangladesh Election : बांगलादेशच्या राजकारणात मोठी हालचाल! कट्टर इस्लामिक संघटनेनेकडून हिंदू उमेदवाराची निवड
भारताविरोधात शेजारील देशांच्या कुरघोड्या वाढल्या? पाकिस्तान पुरवणार बांगलादेशला शस्त्रं
मिळालेल्या माहितीनुसार, कट्टरपंथी मुस्लिम संघटना जमात-ए-इस्लामीने एका हिंदू उमेदवार कृष्णा नंदी यांना खुलाना -१ मतदारसंघासाठी निवडले आहे. यामुळे बांगलादेशाच्या राजकारणात चर्चांणाना उधाम आहे. हे पाऊल आश्चर्यकारक असून बांगलादेशच्या राजकारणात एक नवे वळण आणण्याची शक्यता आहे. बांगलादेशात केनळ १० टक्के हिंदू समुदायाचे लोक राहतात.
एवढेच नव्हे तर गेल्या अनेक दशकांपासून बांगलादेशात खुलाना- १ सीटवर हिंदू नेत्याचेच वर्चस्व आहे. तसेच हिंदू उमेदवारांना विजयही मिळाला आहे. १९९६ पासून हिंदू उमेदवाराची खासदार म्हणून निवड केली जात आहे.
यामुळे जमात-ए-इस्लामीने यावेळी देखील हिंदू उमेदवाराला राजकारणात पुढे करुन वेगळा प्रयोग केलाआहे.
जमात-ए-इस्लामीच्या मते, कृष्णा नंदी हे अत्यंत लोकप्रिय नेते आहे. त्यांची संघटनेवर पकडृ मजबूक असून हिंदू मतदारांना ते सहज एकत्र आणून शकतात. यामुळे कृष्णा नंदी यांना खुलाना -१ चे तिकिट देण्यात आले आहे. कृष्णा नंदी हे
२००३ पासून जमात चे सदस्य आहे. सध्या ते डुमुरिया येथील जमातच्या हिंदू समीतीचे अध्यक्ष आहेत.
बांगलादेशात खळबळ
सध्या बांगलादेशच्या राजकारणात या उमेदवारीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. परंतु जमात-ए-इस्लामने सर्व धर्माचे लोक पक्षात सामील होऊ शकतात अशी घोषणा करत, वेगळा प्रयोग केला आहे. मात्र हा प्रयोग इतर कट्टरपंथी गटांना आणि मोहम्मद युनूस यांना धक्का देणार आहेत. याशिवाय हसीना यांच्या अवामी लीग पक्षावरील बंदीमुळे हिंदू मतदारांमध्ये राजकीयदृष्ट्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा वेळी हिंदूचे मत मिळवण्यासाठी हा जमात-ए-इस्लामीचा खेळ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आता बांगलादेशाच्या राजकारणात आणखी काय ट्विस्ट येतो हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची नवी चाल; आता युनूस सरकार आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार?






