काय आहे पिलखाना हत्याकांड? ज्याअंतर्गत शेख हसीनांवर चौकशी सुरु, भारताशीही आहे संबंध? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Bangladesh News Marathi : ढाका : सध्या बांगलादेशाच्या राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ सुरु आहे. शेख हसीना यांना मोठा धक्का बसला आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या दोन अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात साक्ष दिली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बांगलादेशातील २००९ पिलखाना हत्याकांडा संदर्भात ही साक्ष देण्यात आली आहे. याअंतर्गत राष्ट्रीय स्वतंत्र तापस आयोगाने (NIIC) एका पत्रकार परिषदेदरम्यान धक्कादायक खुलासे केले आहेत.
अवामी लीगचे अध्यक्षीय मंडळाचे सदस्य जहांगीर कबीर नानक आणि पक्षाचे संघटन सचिव मिर्झा आझम यांनी ईमेलद्वारे शेख हसीनांविरोधात पिलखानामधील हत्याकांडासंदर्भात साक्ष दिली आहे. पण हा पिलखाना हत्याकांडा नक्का आहे तरी काय. शेखी हसीना यांच्यावर यासंदर्भात चौकशी का सुरु आहे. याबद्दल आजा आपण जाणून घेणार आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने डिसेंबरमध्ये पिलाखानवर हसीनांविरोधात चौकशीचा निर्णय घेतला होता. २००९ मध्ये पिलखानात मोठ्या प्रमाणात लष्करी उठाव झाला होता. अनेक सैनिकांनी शेख हसीनांच्या मुख्यालयातून शस्त्रे चोरली आणि अधिकाऱ्यांवर गोळीबार केला होता. हा हत्याकांड शेख हसीना यांच्या कार्यकाळात घडला. यामध्ये ५६ अधिकारी मारले गेले होते. यामुळे बांगलादेशात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान गेल्या वर्षी शेख २०२४ मध्ये हसीना यांच्या सरकार पडेल. यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारची स्थापना झाली. या सरकारने २००९ मध्ये झालेल्या या लष्करी उठावावर चौकशी करण्यासाठी एक आयोग समिती स्थापन केली. २००९ मध्ये झालेल्या या बांगलादेश रायफल्स (BDR) ने संपूर्ण बांगलादेशाला हादरवून टाकले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पिलखानातील बंडखोर सैनिकांनी बांगलादेश रायफल्सचे मुख्यालय ताब्यात घेतले होते. बंडखोरांनी मुख्यालयातील बंदूके चोरी केली आणि अनेक अधिकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये बीडीआरच्या महासंचालक शकील अहमद यांच्यासह ५६ अधिकाऱ्यांना ठार करण्यात आले होते. तसेच यामध्ये अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची देखील हत्या करण्यात आली होती.
याअंतर्गत अनेक लोकांना अटक करण्यात आली होती. अटक केलेल्यांविरोधात तात्काळ कारवाई करत त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.दरम्यान शेख हसीना सरकारने या बंडाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. अधिकारी आणि सैनिकांमध्ये तक्रारींमुळे हा उठाव घडला होता. सैनिकांनी अधिकाऱ्यांनी त्यांना वाईट वागणूक आणि कमी पगार दिल्याचा आरोप केला होता. यामुळे हा असंतोष निर्माण झाला होता.
दरम्यान गेल्या वर्षी शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर नव्या अंतरिम सरकारने पूर्वीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि पुन्हा एकदा चौकशी करण्याचा निर्णय घेतला.
गेल्या वर्षी शेख हसीना देश सोडून भारतात आश्रयासाठी आल्या. यामुळे या हत्याकांडात शेख हसीना आणि भारताने भूमिका बजावली असा आरोप अंतरिम सरकारने केला. शेख हसीनांवर लष्कराला कमकुवत करणे आणि स्वत:ची सत्ता मजबूत करणे यासाठी या संकटाचा वापर केला असल्याचे म्हटले जाते. यामध्ये भारताने शेख हसीनांची साथ दिल्याचा आरोप आहे. यामुळेच भारत आणि बांगलादेशातील संबंध ताणले गेले आहेत.