Bangaldesh News : शेख हसीना पुन्हा सत्तेत येणार? कतारमध्ये रचला जात आहे मोठा डाव (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नॉर्थ इस्ट पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, कतार बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना राजकारण पुन्हा स्थापित करण्याची तयारी करत आहे. यासाठी दोहामध्ये बैठका देखील घेतल्या जात आहे. नुकतेच बांगलादेशच्या वतीन पर्यवेक्षण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलीलूर रहमान यांनी भारताला भेट दिली होती. खलीलूर रहमान हे शेख हसीना यांच्या जवळचे मानले जातात. त्यांच्या भारत भेटीचा हेतू हसीना पुन्हा सत्तेत येतील हे सुनिश्चित करणे होता. आता यामध्ये कतार देखील मध्यस्थी करत असल्याचे म्हटले जात आहे.
मात्र औपचारिकपणे यामध्ये कतारचा किंवा इतर कोणचा सहभाग आढळून आलेला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, कतारचे माजी गुप्तचर प्रमुख खुलाईफी यांनी खलीलूर रहमान यांनी गेल्या काही महिन्यात अनेक वेळा भेट गेतली आहे. तसेच रहमान यांनी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना देखील भेट दिली आहे. या भेटीचा उद्देश प्रथम बांगलादेशात हसीना यांच्या पक्ष अवामी लीगवरील बंदी उठवणे आहे. सध्या कतार आणि अमेरिकेत बांगलादेशात अवामी लीग पक्षाला निवडणुकांमध्ये सहभाग घेण्यासाठी परवानगी मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
रहमानयांनी यापूर्वी देखील अनेक वेळा कतारमध्ये यासाठी अनेक बड्या आणि महत्वपूर्ण अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. सध्या अवीमा लीग पक्षावर अंतरिम सरकारने बंदी घातली असून त्यांना निवडणूक लढवात येणे शक्य नाही. यामुळे हसीना यांना पुन्हा राजकीय व्यवस्थेत आणण्यासाठी प्रथम अवामी लीगवरील बंदी हटवण महत्वाचे आहे. बांगलादेशात येत्या फेब्रुवारी २०२६ मध्ये निवडणुका होणार आहे. त्यापूर्वी अवामी लीगवरील बंद हटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील देभरात निषेध सुरु ठेवला आहे. काही दिवसांपूर्वीच ढाकात अनेक ठिकाणी हसीनाच्या समर्थकांनी निषेधार्थ मोर्चा काढला होता.
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची नवी चाल; आता युनूस सरकार आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार?






