न्यूयॉर्क : टायटॅनिक (Titanic Ship) जहाजाची 1912 मध्ये दुर्घटना घडली होती. त्यापासून या अपघाताचे रहस्य अजून कोणालाच समजले नाही. त्यामुळे या रहस्यमयी गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी एक पाणबुडी टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेली होती. मात्र, अटलांटिक महासागरात गेलेली पाणबुडी अजूनही बेपत्ता आहे. विमानाच्या माध्यमातून शोधमोहीम राबवली जात आहे. त्यामध्ये समुद्रातून लोकांचा किंचाळण्याचा आवाज समोर आला आहे. या प्रकारानंतर त्या भागात अतिरिक्त सोनार यंत्र तैनात करण्यात आले. यातील अब्जाधीशांकडे काही तासांचाच ऑक्सिजन शिल्लक असल्याची माहिती पुढे येत आहे.
पाणबुडी शोधण्यासाठी खूप कमी वेळ आहे. त्यामुळे शोधमोहिम अत्यंत वेगात सुरु आहे. पाणबुडीमध्ये पायलट आणि चार पर्यटक आहेत. या पर्यटकामध्ये ब्रिटनचे अब्जाधीश हामिश हार्डिंग यांचाही समावेश आहे. टायटॅनिकचे अवशेष दाखविण्यासाठी निघालेली ही पाणबुडी रविवारी बेपत्ता झाली होती. तेव्हापासून या पाणबुडीचा शोध घेण्यात येत आहे.
या पाणबुडीत पाकिस्तानी अब्जाधीश प्रिन्स दाऊद, त्याचा मुलगा सुलेमान, ब्रिटिश उद्योगपती हमिश हार्डिंग यांच्यासह पाचजण आहेत. ही पाणबुडी चालवणारी कंपनी ओशनगेटचे सीईओ स्टॉकटन रश आणि फ्रेंच संशोधक पॉल आनरी नार्जेलेट हेदेखील या पाणबुडीत आहेत.
थोडाच ऑक्सिजन शिल्लक
टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचा रविवारपासून संपर्क तुटला आहे. काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन पाणबुडीमध्ये शिल्लक आहे. या पाणबुडीमध्ये पायलट आणि चार पर्यटक आहेत. दरम्यान, पाणबुडी बेपत्ता झाल्याचे समजताच अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांकडून शोधमोहिम राबवली जात आहे.