भारतासाठी धोक्याची घंटा! लडाखमधील पॅंगोंग तलावाजवळ चीनच्या लष्करी हालचाली; ड्रॅगनच्या खतरनाक योजनेचा खुलासा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या जग अनेक आघाड्यांवर संघर्षात अडकलेला आहे. एकीकडे इराण-इस्रायल, दुसरीकडे युक्रेन-रशिया तर तिसरीकडे भारतासोबत चीन आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. सध्या इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीच्या चर्चेवरुन वाद सुरु आहे. यामध्ये एक धक्कादायक माहितीचा खुलासा करण्यात आला आहे. पूर्ण लडाखमधील पँगोंग तलावाजवळ चीनने आपली HQ-16 ही हवाई प्रणाली तैनात केली आहे. याच्या सॅटेलाईट्स छायाचित्र सध्या समोर आले आहे. यामुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे.
चीनच्या या HQ-16 हवाई संरक्षण प्रणालीमध्ये ४० ते ७० किलोमीटपर्यंत शत्रूचे हवाई तळ नष्ट करण्याची क्षमता आहे. या सॅटेलाईट प्रमितेमध्ये दिसून येत आहे की, HQ-16 TEL पॅंगोग तलावाच्या अगदी जवळ आहे. चीनच्या या हालचालीमुळे या प्रदेशातील धोरणात्मक परिस्थितीत बिघडण्याची शक्यता आहे. चीनच्या या प्रत्येत हालचालींवर भारतीय सुरक्षा संस्था बारकाईने लक्ष ठेवून आहे.
Satellite Imagery shows HQ-16 Air defence system deployed at the Pangong Tso Lake.
HQ-16 Air defence system can engage various types of aerial targets at a range of 40kms or more depending on the version. pic.twitter.com/FopvWt5X99— Mrcool (@Mrcool63040811) June 24, 2025
सध्या चीनच्या पँगोंग सरोवरजवळील हालचाली भारतावर धोरणात्मक दबाव आणण्याचा प्रयत्न मानली जात आहे. यामुळे पुन्हा एकदा चीन आणि भारतामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.