वातावरणात सध्या खूप झपाट्याने बदल होत आहेत. पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे जगासमोर संकटांची मालिका सुरु झाली आहे. बहुतांश देशात पाण्याची टंचाई आहे. सगळ्या जगाला हवामान बदलाचे (Climate Change) परिणाम भोगावे लागत आहेत. ही परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच अनेक शास्त्रज्ञांनी जागतिक तापमान वाढीबाबत चिंता व्यक्त केली आहे. हवामान बदलांमुळे हिमनग खूप जास्त प्रमाणात वितळू लागले आहेत. (Global Warming) त्यामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहेत. जर वातावरणातील प्रदूषण वाढत राहिलं, तर येणाऱ्या दिवसांत प्रचंड तापमान वाढ होणार आहे. या तापमान वाढीचा वाईट परिणाम काय होऊ शकतो हे जाणून घेऊयात. (Climate Change Effect On World)
वेळेआधी जन्माला येतील मुलं
हवामानातील वाढत्या तापमानामुळे तणाव आणि नवजात शिशूंचा जन्म वेळेआधी होण्याचं प्रमाण वाढेल. तसेच विचार क्षमतेवरही परिणाम होईल. साधारणपणे 1850 पासून ते 1900 पर्यंतचा काळ औद्योगिक पूर्व जग म्हणून ओळखले जाते. मिळालेल्या माहितीनुसार 1850 पासून ते 2020 पर्यंत तापमानात सरासरी 1.1 डिग्री सेल्सियसची वाढ झाली आहे. खनिज तेलाच्या अतिवापरामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही गेल्या 2000 हजार वर्षातील सर्वाधिक तापमान वाढ आहे.
ह्रदयविकाराच्या वाढतील समस्या
एका रिपोर्टनुसार, वाढत्या तापमानामुळे तणाव वाढेल. यामुळे हृदयविकाराशी संबंधित समस्या आणि स्ट्रोक्समध्येही वाढ होईल. प्रसुतीपूर्व जन्मदर आणि बाल मृत्यूदरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीच्या घटना वाढतील आणि दरवर्षी दीड लाख लोक मृत्यूमूखी पडतील.
पावसाच्या वेळापत्रकात बदल
तापमानवाढीमुळे बाष्पीभवनाच्या क्रियेत वाढ होईल. यामुळे पावसाचं प्रमाण वाढेल. काही परिसरात जास्त पाऊस, तर काही परिसरात कमी पाऊस पडू शकतो. यामुळे ओला आणि कोरडा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. ‘ग्रीनपीस ईस्ट आशिया’च्या रिपोर्टनुसार, 2023 पर्यंत समुद्रातील पाण्याची पातळी खूप वाढेल. यामुळे सात आशियन शहरातील कमीत कमी दीड कोटी लोक आणि 1829 वर्गकिलोमीटरच्या जमिनीच्या भागावर परिणाम होईल. या रिपोर्टनुसार, 2030 पासून ते 2050 पर्यंत अनेक प्रकारच्या रोगांचा लोकांना संसर्ग होईल. यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढेल.
आम्लधर्मीय समुद्र आणि सजीवांच्या अस्तित्वाला धोका
हवेतील वाढलेले कार्बन डाय ऑक्साईड आणि ग्रीन हाऊस गॅसचे समुद्राच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मिसळत आहेत. यामुळे समुद्र आम्लधर्मीय होत आहे. यामुळे समुद्रातील अनेक सजीवांच्या अस्तित्वाला आता धोका निर्माण झाला आहे.