ट्रम्प स्वतःला देव समजतो, पुन्हा केले असे वादग्रस्त विधान, म्हटले - 'माझ्या मनात येईल ते मी करेन...' ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Trump New York Times interview 2026 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा आपल्या विधानांनी संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ट्रम्प यांनी आपली सत्ता आणि आंतरराष्ट्रीय नियम यावर भाष्य करताना स्वतःला जणू ‘सर्वोच्च’ मानल्याचे दिसून येत आहे. “मला कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याची पर्वा नाही, मला थांबवू शकणारी एकमेव गोष्ट म्हणजे माझी स्वतःची नैतिकता आणि माझे मन,” असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे जागतिक राजकारणात नवा वाद पेटला आहे.
जेव्हा ट्रम्प यांना विचारण्यात आले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करणे बंधनकारक आहे का? त्यावर त्यांनी अत्यंत सूचक उत्तर दिले. ते म्हणाले, “हे तुमच्या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या व्याख्येवर अवलंबून आहे. मी लोकांना त्रास देऊ इच्छित नाही, पण अमेरिकेच्या हितासाठी मला जे योग्य वाटेल तेच मी करेन.” याच विचारसरणीतून त्यांनी ७ जानेवारी २०२६ रोजी अमेरिकेला ६६ आंतरराष्ट्रीय संघटना आणि करारांमधून बाहेर काढण्याचा ऐतिहासिक आणि वादग्रस्त निर्णय घेतला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Protest 2026: ‘मी तर 47 वर्षांपूर्वीच मेलीये!’ रक्ताने माखलेल्या आजीचा खामेनेई राजवटीला थरकाप उडवणारा इशारा; पाहा VIDEO
ट्रम्प यांनी ग्रीनलँड या डेन्मार्कच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रदेशावर पुन्हा एकदा हक्क सांगितला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, भाडेतत्त्वावर किंवा केवळ करार करून यश मिळत नाही, तर ‘मालकी’ असणे मानसिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. “मालकी तुम्हाला अशी ताकद देते जी केवळ कागदावर स्वाक्षरी करून मिळत नाही,” असे म्हणत त्यांनी ग्रीनलँड अमेरिकेचा भाग बनवण्यावर भर दिला. या विधानामुळे डेन्मार्क आणि युरोपीय देशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
NEW: 🇺🇸 Trump stated that he doesn’t need international law and he will sacrifice NATO for Greenland – New York Times Trump said in an interview with the New York Times that there are no limits to his global influence, except for his own morality. “My own morality. My mind is… pic.twitter.com/eDcig4UnpY — Megatron (@Megatron_ron) January 8, 2026
credit : social media and Twitter
तैवानच्या मुद्द्यावर बोलताना ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दिलेल्या इशाऱ्याचा पुनरुच्चार केला. “मी राष्ट्राध्यक्ष असताना शी जिनपिंग तैवानवर ताबा मिळवण्याचे धाडस करणार नाहीत. मी त्यांना स्पष्ट सांगितले आहे की, असे झाल्यास मला ते अजिबात आवडणार नाही. कदाचित माझ्या नंतर येणाऱ्या राष्ट्राध्यक्षांच्या काळात चीन असे करू शकेल, पण माझ्या कार्यकाळात हे शक्य नाही,” असे ट्रम्प यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Protest 2026: ‘मी तर 47 वर्षांपूर्वीच मेलीये!’ रक्ताने माखलेल्या आजीचा खामेनेई राजवटीला थरकाप उडवणारा इशारा; पाहा VIDEO
नुकत्याच झालेल्या व्हेनेझुएलातील लष्करी कारवाईचे समर्थन करताना ट्रम्प म्हणाले की, मादुरो यांना सत्तेवरून हटवणे अमेरिकेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक होते. त्यांनी दावा केला की, मादुरो ड्रग्ज कार्टेलच्या माध्यमातून अमेरिकेला धोका निर्माण करत होते. चीन आणि रशिया यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाहीत, कारण ही अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित बाब आहे, असा युक्तिवादही त्यांनी केला.
Ans: ट्रम्प म्हणाले की, त्यांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याची पर्वा नाही. त्यांना केवळ त्यांची स्वतःची नैतिकता आणि विचार रोखू शकतात.
Ans: ट्रम्प यांनी अमेरिकेला तब्बल ६६ आंतरराष्ट्रीय संघटना आणि उप-संघटनांमधून बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत.
Ans: ट्रम्प यांच्या मते, ग्रीनलँडवर अमेरिकेची 'मालकी' असणे राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि यशासाठी आवश्यक आहे, केवळ करार पुरेसे नाहीत.






