ट्रम्पवर एलॉन मस्क ठरत आहे का वरचढ (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश एलोन मस्क यांच्यातील घनिष्ठ मैत्री आता तुटली आहे. दोघेही एकेकाळी घट्ट मित्र होते मात्र गेल्या काही महिन्या्ंपासून एकमेकांचे शत्रू बनले आहेत आणि हे जगजाहीर आहे. ट्रम्पशी मैत्री तुटल्यानंतर मस्कची कारकीर्द धोक्यात येऊ शकते असे मानले जात होते, परंतु आता मस्कशी असलेले त्यांचे शत्रुत्व ट्रम्पसाठी महागात पडत आहे असे चित्र सध्या जगासमोर स्पष्ट होत आहे. संबंध बिघडल्यानंतर ट्रम्प मस्कच्या स्पेसएक्ससोबतचा सरकारी करार रद्द करू इच्छित होते, परंतु आता असे मानले जात आहे की ते इतके सोपे नाही (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
मस्कचा करार रद्द होऊ शकतो का?
‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ नुसार, ट्रम्प प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी SpaceX च्या नासा आणि पेंटागॉनसोबतच्या करारांचा आढावा घेतला. या दरम्यान, त्यांना असे आढळून आले की मस्कचा करार रद्द केल्याने अमेरिकेच्या प्रमुख अवकाश आणि संरक्षण कार्यक्रमाचे मोठे नुकसान होऊ शकते. पुनरावलोकनात असेही आढळून आले की स्पेसएक्सच्या सध्याच्या करारांपैकी फक्त काही करारच छाननीत येऊ शकतात. खरं तर, कोणताही करार रद्द करण्यात आला नाही कारण इतर कोणतीही कंपनी समान किमतीत समान काम करू शकते.
Earthquake in US: अमेरिकेच्या अलास्कात ६.२ तीव्रतेचा भूकंप; तझाकिस्तानचीही जमीन हादरली
अमेरिकेसाठी स्पेसएक्स का गरजेचे?
स्पेसएक्स ही एक आघाडीची प्रक्षेपण सेवा प्रदाता कंपनी आहे. गेल्या वर्षी जगभरात प्रक्षेपित केलेल्या सर्व उपग्रहांपैकी ८३ टक्के उपग्रहांच्या मागे ही कंपनी होती. स्पेसएक्स बऱ्याच काळापासून अमेरिकन सरकारसाठी कंत्राटदार आहे. जेफ बेझोसची ब्लू ओरिजिन कंपनी मस्कच्या स्पेसएक्सच्या काही स्पर्धकांपैकी एक आहे, जरी मस्कला ट्रम्प सरकारकडून २८ करार मिळाले असले तरी, बेझोसला फक्त ७ करार मिळाले, जे स्पेसएक्सला आव्हान देण्यासाठी खूपच कमी आहेत.
इतर कंपन्यादेखील सरकारशी जोडलेल्या
जर याबाबत अधिक जाणून घ्यायचे झाले तर एलोन मस्कची स्पेसएक्स ही सरकारशी जोडलेली एकमेव कंपनी नाही, परंतु अलीकडेच पेंटागॉनने एआयच्या लष्करी वापरासाठी मस्कच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस स्टार्टअप xAI सोबत २०० दशलक्ष डॉलर्सचा करार केला होता. एकूणच, एलोन मस्कने सरकारकडून ३८ अब्ज डॉलर्सचे सौदे मिळवले आहेत, ज्यात एकट्या टेस्लासाठी १५.७ अब्ज डॉलर्सचे सौदे समाविष्ट आहेत, त्यापैकी बहुतेक बायडेनच्या कार्यकाळात मंजूर झाले होते.
बराक ओबामांना गुडघ्यावर बसवलं अन्…; डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेल्या व्हिडिओची जगभरात चर्चा
FAQs (संबंधित प्रश्न)
एलोन मस्कची एकूण संपत्ती किती आहे?
एलोन मस्कची एकूण संपत्ती $३३५ अब्ज आहे.
एलोन मस्क किती कंपन्यांचे मालक आहेत?
एलोन मस्ककडे टेस्ला, स्पेसएक्स, एक्स (पूर्वी ट्विटर), द बोरिंग कंपनी, न्यूरालिंक आणि एक्सएआय यासह ६ कंपन्या आहेत.