भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं जपान, 6.1 रिश्टर स्केल तिव्रता; लोकांना घरांपासून दूर राहण्याचा इशारा!

सोमवारी रात्री उशिरा जपानमध्ये झालेल्या भूकंपामुळे पृथ्वी हादरली. त्याची तीव्रता 6.1 एवढी आहे. अनेक भागात लोकांना घरापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला होता.

    नेहमीचं भुंकपाचे धक्के सोसणाऱ्या जपानमध्ये सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के (Earthquake in Japan ) जाणवले. भूकंपामुळे जपानच्या अनेक कंपन जाणवली. मात्र, या भूकंपामुळे अद्याप कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. रिपोर्ट नुसार, जपानच्या इवाते आणि आओमोरी प्रांतात ६.१ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले.

    लोकांना घरापासून दूर राहण्याचा इशारा

    जपानमधील भूकंपाने रात्री उशिरा लोकांमध्ये घबराट पसरली होती. अनेक जण स्वतः घराबाहेर पडून रस्त्यावर आले. तथापि, भूकंपाचा केंद्रबिंदू इवाते प्रीफेक्चरचा उत्तर किनारपट्टी भाग होता. हवामान खात्याकडून सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. तरीही प्रशासनाने काही भागातील लोकांना घरापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

    जानेवारीत झाला होता मोठा भूंकप

    या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भूकंपाने जपानमध्ये मोठा भूकंप झाल होता. या भुंकपात पश्चिम जपानमधील अनेक शहरांमध्ये हजारो घरे उद्ध्वस्त झाली आणि अनेक जीवन संपत्तीचे नुकसान झाले होते, तर  50 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. किनारी भागातील शहरांमध्ये वादळात अनेक मोठ्या इमारती, वाहने आणि मोठमोठ्या बोटींचेही नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबे बेघर झाली होती.