डेल्टा एअरलाइन्सच्या बोईंग ७६७ इंजिनला हवेतच लागली आग; लॉस एंजेलिसमध्ये आपत्कालीन लँडिंग (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे. लॉस एंजलिसमध्ये एका डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला अचानक आग लागली. यामुळे विमानाचे आपत्कालीन लॅंडिग करण्यात आले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने पुन्हा एकदा गुजरातच्या अहमदाबादमधील विमान अपघाताची आठवण करुन दिली आहे. या अपघातामध्ये अनेकांचा बळी गेला आहे. याने संपूर्ण जगभर दु:खाचे वातावरण पसरलेले होते.
दरम्यान अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्ये डेल्टा एअरलाइन्सच्या फ्लाइट डीएल-४४६ च्या इंजिनने उड्डण घेतल्यानंतर पेट घेतला. यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान लॉस एंजलिसच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटलांटाकडे निघाले होते. यावेळी उड्डाणनंतर काही मिनंटांनी डाव्या इंजिलनाला आग लागली. यामुळे प्रवशांचा जीव धोक्यात आला होता. परंतु विमानाच्या पायलटने तातडीने आपत्कालीन लॅंडिग केले यामुळे मोठा धोका टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान बोईंग ७६७-४०० होते. विमानाला आग लागताच इंजिनमधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना लोकांना दिसल्या. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये इंजिनमधून मोठ्या आगीच्या ज्वाळा दिसत आहेत.
Boeing 767 catches FIRE MID-AIR Delta plane makes EMERGENCY landing at Los Angeles International Airport Video shows engine in FLAMES pic.twitter.com/A7SqLS0wym — RT (@RT_com) July 19, 2025
सुदैवाने पायलटच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचा जीव बचावला. इंजिनला आग लागल्याचे समजताच पायलटने तातडीने ‘मेडे’ घोषिक करुन एअर ट्राफिक कंट्रोलला माहिती दिली. त्यानंतर विमानाचे तातडीने सुरक्षितपणे नियंत्रण दिशा बदलत आपत्कालीन लॅंडिग करण्यात आले. विमान काळजीपूर्व धावपट्टीवर उतरवण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी पोहचून प्रवाशांना बाहेर काढले आणि इंजिनला लागलेली आग विझवली.
पायलटच्या सतर्कतेमुळे क्रू मंबर्ससह २३५ प्रवाशांचे प्रा बचावले. सध्या आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासाठी फेडरल ॲडमिनिस्ट्रेशनने घटनेची चौकशी सुरु केली आहे. हे विमान २५ वर्षे जुने असून यामध्ये GE CF-6 इंजिन आहेत. डेल्टा एअरलाईन्सच्या इंजिनमध्ये तांत्रित बिघाडाची ही दुसरी घटना आहे.