Ahmeabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातग्रस्तांना मिळणार न्याय? अखेर Boeing विरोधात खटला दाखल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Ahmeabad Plane Crash : एक मोठे वृत्त समोर आले आहे. अहमदाबाद विमान मृत्यूमुखी पडलेल्या तार प्रवाशांच्या कुटुंबियांनी बोईंग कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे. तेसच विमानेच घटक उत्पादक कंपनी हनीवेल विरोधातही खटला दाखल करण्यात आला आहे. या विमान अपघाताने संपूर्ण जगाला हादरवून टाकले होते.
अहमबाद विमान अपघात (Ahmedabad plane Crash)
१२ जून रोजी एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाईइनरचा अहमदाबादकडून लंडनला जाताना भीषण अपघात झाला होता. टेक-ऑफच्या काही सेंकदानंतर विमान एका हॉस्टेलवर कोसळले होते. यामध्ये २२९ प्रवासी, १२ क्रू मेंबर्स आणि २७० प्रवासी तर अहमदाबादमधील १९ नागरिकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये विदेश प्रवाशांचा देखील समावेश होता.
यामध्ये बोईंग कंपनीच्या ७८७ मॉडेलचा अपघात झाला होता. तसेच यानंतरही बोईंग कंपनीच्या अनेक विमानांचा अपघात झाल आहे किंवा अपघात होता होता टळला आहे. आतापर्यंत १० हून अधिक बोईंग विमानांचा अपघाताची नोंद झाली आहे. यामुळे बोईंग कंपनीच्या विमान सुरक्षा आणि व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात होते.
आता या दुर्घटनेनंतर पीडितांच्या कुटुंबीयांनी बोईंग विमान कंपनी आणि त्याचे पार्ट्स तयार करणारी कंपनी हनीवेल विरोधात खटला दाखल केला आहे. टेक्सासमधील लॅनियर लॉ फार्मच्या माध्यमातून खटला दाखल करण्यात आला आहे. पीडितांच्या कुटुंबियांनी बोईंग आणि हनीवेलवर आरोप केला आहे की, विमानातील फ्युएल कंट्रोल स्विचमध्ये बिघाड झाला होता आणि कंपनीला याची आधीपासूनच माहित होती. तसेच अपघातानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
अपघातानंतर तापसादरम्यान आढळून आले की, इंजिनला मिळणारा इंधनपुरवठा अचानक बंद झाला होता. याच वेळी पायटने स्विच रन वरुन कट-ऑफ केला. यामुळे हा अपघात घडला. पायलटन पुन्हा स्विच सुरु करण्याचा प्रयत्न केला होता, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तपास अधिकाऱ्यांनी याला विमान बनवताना डिझानमधील त्रुटी असल्याचे सांगितले. तर कॉकपिटमधील रेकॉर्डिंगवरुन स्विच आपोआप बंद झाल्याचे आढळून आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या अपघाताच्या चार आठवड्यांपूर्वी ब्रिटनच्या सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीने बोईंगच्या फ्युएल स्विच बाबत अलर्ट दिला होता. पण तरी देखील प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आहे. यामुळे बोईंग कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्याचा आरोप पीडितांच्या कुटुंबाने केला आहे.
दरम्यान बोईंग कंपनीने यावर कोणतेही विधान करण्यास नकार दिला आहे. तपास अहवाल २०२६ मध्ये प्रसिद्ध केला जाणार आहे. बोईंगने ७८७ ड्रीमलाईनरच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांसाठी १०० कोटी जाहीर केले आहे. पण अहमदाबा दुर्घटनेमुळे सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बोईंग ७८७ विमानावर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. बोईंग कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे पीडीतांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यामुळे कंपनीवर कठोर कारवाई मागणी केली जात आहे.
अहमदाबामध्ये विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला?
अहमदबाद विमान अपघतात २२९ प्रवासी, १२ क्रू मेंबर्स आणि २७० प्रवासी तर अहमदाबादमधील १९ नागरिकांचा मृत्यू झाला होता.
काय आहे अहमदाबाद विमान अपघाताचे कारण?
बोईंग विमानातील तांत्रिक त्रुटीमुळे म्हणजे, इंजिनला अचनाक इंधन पुरवठा बंद झाल्याने विमानाता अपघात घडला होता. या स्विच आपोआप बंद झाले होते. याला विमानाच्या डिझानमधील त्रुटी मानली गेली. यामुळे अपघात घडला.
बोईंग आणि हनीवेलवर खटला का दाखल करण्यात आला?
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, विमान कंपनीला फ्युएल कंट्रोल स्विचमध्ये बिघाडाची माहित आधीच होती, पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे खटला दाखल करण्यात आला आहे.
अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाचे ११२ पायलट का गेले होते रजेवर? समोर आलं मोठं कारण