चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्योदयाचे दृश्य पाहून तुमची नजर हटणार नाही, अमेरिकन 'ब्लू घोस्ट'ने पाठवली सुंदर छायाचित्रे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
वॉशिंग्टन / टेक्सास – अमेरिकेतील टेक्सासस्थित फायरफ्लाय एरोस्पेस या खाजगी कंपनीच्या ‘ब्लू घोस्ट लँडर’ने २ मार्च रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग करत एक नवा विक्रम प्रस्थापित केला. चांद्रयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच तिथल्या सूर्योदयाच्या अप्रतिम छायाचित्रांचा संच पृथ्वीवरील तंत्रज्ञान केंद्राला पाठवला आहे. या अभूतपूर्व यशामुळे चंद्राच्या शोधात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे.
चांद्रयानाचे ऐतिहासिक यश
फायरफ्लाय एरोस्पेसच्या या ऐतिहासिक मोहिमेने अमेरिकेच्या खाजगी अंतराळ संशोधनाला नवी दिशा दिली आहे. ब्लू घोस्ट लँडरच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर विविध वैज्ञानिक प्रयोग राबवले जाणार आहेत. विशेषतः या मोहिमेतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे चंद्राच्या वातावरणातील स्थिती, पृष्ठभागाचा अभ्यास आणि भविष्यातील मानवी वस्तींसाठी संभाव्य स्थानांचा शोध. फायरफ्लाय एरोस्पेसने आपल्या अधिकृत X (ट्विटर) हँडल वरून ब्लू घोस्ट लँडरने पाठवलेल्या छायाचित्रांचा प्रकाशन केला आहे. या छायाचित्रांमध्ये चंद्राच्या क्षितिजावर उगवणाऱ्या सूर्याचे मोहक दृश्य दिसते. हे दृश्य इतके भव्य आणि अप्रतिम आहे की त्यावरून नजर हटवणे कठीण आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते…डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वांसोमर केले ‘हे’ 7 खोटे दावे, वाचा यामागचे सत्य
‘अथेना’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या दिशेने
याचवेळी, टेक्सासस्थित इंट्युटिव्ह मशिन्सच्या ‘अथेना’ या चांद्रयानानेही चंद्राच्या दिशेने प्रस्थान केले आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील ‘जेट-ब्लॅक क्रेटर’ या कायम अंधारमय प्रदेशाचा अभ्यास करणे आहे. या भागात सूर्यप्रकाश कधीच पोहोचत नाही, त्यामुळे या ठिकाणी बर्फ किंवा अन्य खनिजसंपत्ती असण्याची शक्यता आहे. स्पेसएक्स या अमेरिकन कंपनीच्या सहाय्याने नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून ‘अथेना’ यान प्रक्षेपित करण्यात आले. भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी आणि चंद्रावरील संभाव्य वसाहतींसाठी या मोहिमेचा मोठा उपयोग होणार आहे.
मेरिकेतील टेक्सासस्थित फायरफ्लाय एरोस्पेस या खाजगी कंपनीच्या ‘ब्लू घोस्ट लँडर’ने २ मार्च रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग करत एक नवा विक्रम प्रस्थापित केला. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
चंद्रावर अनेक मोहिमांचे एकत्र आगमन
गेल्या काही दशकांत प्रथमच इतकी मोठी संख्या एकाच वेळी चंद्रावर उतरली आहे. अमेरिकन आणि जपानी कंपन्यांनी संयुक्तपणे रॉकेट प्रक्षेपण करत चंद्रावरील मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. याशिवाय, फायरफ्लाय एरोस्पेसच्या ‘ब्लू घोस्ट’च्या आगमनामुळे चंद्र संशोधनाच्या क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला आहे. गेल्या काही दशकांमध्ये फक्त पाच देशांना चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग करण्यात यश आले आहे – रशिया, अमेरिका, चीन, भारत आणि जपान. या देशांनी चंद्राच्या विविध भागांचा अभ्यास करून भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी महत्त्वपूर्ण माहिती जमा केली आहे.
Watch Firefly land on the Moon! After identifying surface hazards and selecting a safe landing site, #BlueGhost landed directly over the target in Mare Crisium. A historic moment on March 2 we’ll never forget. We have Moon dust on our boots! #BGM1 pic.twitter.com/02DQJzn0hL
— Firefly Aerospace (@Firefly_Space) March 4, 2025
credit : social media
इस्रोचे 2040 साठी भव्य उद्दिष्ट
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) देखील चंद्रावर मानवी मोहिम पाठवण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही नारायणन यांनी ४ मार्च रोजी घोषणा केली की, २०४० पर्यंत भारत चंद्रावर मानवी पाऊल ठेवणार आहे. आयआयटी रुरकी येथे झालेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ही घोषणा करण्यात आली. या परिषदेत अमेरिका, कॅनडा, दक्षिण कोरिया आणि नेदरलँडसह अनेक देशांच्या अंतराळशास्त्रज्ञांनी सहभाग घेतला.
फायरफ्लाय एरोस्पेसच्या या ऐतिहासिक मोहिमेने अमेरिकेच्या खाजगी अंतराळ संशोधनाला नवी दिशा दिली आहे. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
इस्रोचे अध्यक्ष म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रावर भारतीय नागरिकाला पाठवण्यास उत्सुक आहेत. या दिशेने इस्रो सातत्याने संशोधन आणि विकास कार्य करत आहे. तसेच, २०३० पर्यंत भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन स्थापन करण्याचाही मोठा संकल्प आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेने NATOतून माघार घेतल्यास युरोपात अराजकता माजणार? पुतिनच्या रडारवर असतील ‘हे’ देश
चंद्र संशोधनाचा सुवर्णकाळ सुरू
‘ब्लू घोस्ट लँडर’च्या यशस्वी लँडिंगमुळे चंद्रावरील संशोधनाला नवी गती मिळाली आहे. ‘अथेना’ यान दक्षिण ध्रुवाजवळील गूढ प्रदेशाचा शोध घेत आहे, तर इस्रो भविष्यात मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे. अंतराळ संशोधनाच्या या नव्या पर्वात तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड वाढला असून, लवकरच चंद्रावर मानवी वसाहत स्थापन करण्याची स्वप्न साकार होऊ शकतात.