G7 Summit : PM मोदींनी परिषदेत उपस्थित केला भारतीय नाविकांच्या मृत्यूचा मुद्दा; ट्रम्प यांच्या समोर होर्मुझ हल्ल्यांचा थेट निषेध (फोटो सौजन्य: एक्स@narendramodi)
या परिषदेच्या आउटरीच सत्रादरम्यान १६ महिन्यांनतर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) एका व्यासपाठीवर एकत्र आले. दोन्ही नेत्यांची भेट जागतिक मुत्सद्देरिगीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यावेळी पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियाताली तणावावर आणि होर्मुझमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.
तसेच त्यांनी होर्मुझमध्ये जहाजांवर होणाऱ्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला. त्यांनी सांगितले की, या तणावामुळे भारतीय नाविकांना जीव गमवाला लागला आहे. यामुळे सर्व निर्दोष नाविकांच्या सुरक्षा सुनिश्चित करणे ही जगातील सर्व देशांची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की होर्मुझ(Hormuz) चा समुद्री मार्ग सुरक्षित ठवण्याची आणि व्यापारा नुकसान होणार नाही हे सर्व देशांनी सुनिश्चित केले पाहिजे.
The interactions with world leaders continue at the G7 Summit in Evian.@G7 pic.twitter.com/ZOrAaffrcX — Narendra Modi (@narendramodi) June 16, 2026
जागतिक नेत्यांना संबोधित करताना त्यांनी म्हटले की, जगात साधनसंपत्तीची कमतरता नाही, तर सर्व देशांमध्ये विश्वासाची कमतरता आहे, कोविड महामारीने सर्व देशांमधील विश्वासाचे दावे किती कमकुवत होते हे स्पष्ट केले होते, असे त्यांनी म्हटले. याशिवाय त्यांनी तंत्रज्ञान आणि जागतिक पुरवठा साखळीचा वापर शस्त्रासारखा न करता मानवतेच्या भल्यासाठी व्हायला हवा अस त्यांनी नमूद केले.
त्यांनी भारताच्या मानवतावादी भूमिकेचा उल्लेख करत, कोविड काळात १५० हून अधिक देशांना भारताने औषधे आणि लस पुरवल्याचे सांगितले. तसेच श्रीलंका, मोझांबिक, आणि अफगाणिस्तानच्या देशांतील संकटात भारताने केलेल्या मदतीचाही उल्लेख केला.
बुधवारी (१७ जून) मोदी आणि ट्रम्प यांच्यात महत्त्वाची द्विपक्षीय चर्चा होणाची शक्यता आहे. यामध्ये मोठ्या व्यापार करारावर आणि दोन्ही देशांतील व्यापारी संबंधावर सकारात्मक चर्चा अपेक्षित आहे.
Shared my thoughts at the Outreach Session on ‘Forging New Partnerships and Rebuilding International Solidarity’ at the G7 Summit in Evian. In a world that is getting more interconnected and interdependent than ever before, this subject becomes all the more vital. But,… pic.twitter.com/NjNddWGtFF — Narendra Modi (@narendramodi) June 16, 2026






