फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: आफ्रीकन देश हैतीमध्ये भीषण हत्याकांड सुरू आहे. यामुळे तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे. हैतीच्या पोंट सोंडे शहरात एक टोळीच्या लोकांनी हल्ले केले आहेत. संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार या हत्याकांडात किमान 70 नागरिक मारले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काही लोक रायफलसह पोंट सोंडे शहरात घुसले आणि त्यांनी रहिवाशांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. यूएन मानवाधिकार कार्यलयाने या घटनेची माहिती दिली आहे.
घटनेची माहिती देताना मानवाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, शुक्रवारी ग्रॅन ग्रीफ टोळीतील सशस्त्र गुन्हेगारांनी तीन मुलांसह किमान 70 लोकांची हत्या केली आहे. या हत्याकांडामुळे किमान 3 हजार लोक घर सोडून पळून गेले आहेत. वास्तविक, हल्लेखोरांनी स्वयंचलित रायफलने सतत गोळीबार केला. यानंतर हैती नागरिकामध्ये भितीचे वातावरण पसरल्याने लोक जीव वाचवण्याच्या प्रयत्नात घर सोडून जात आहेत.
पोंट-सोंडे शहरात गुरुवारी हल्ला झाला
संयुक्त राष्ट्र संघाचे वरिष्ठ अधिकारी, थामीन अल-खेतान यांनी एका निवेदन जारी केले. त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, “गुरुवारी हैतीच्या आर्टिबोनाइट विभागातील पोंट-सोंडे शहरात झालेल्या टोळी हल्ल्यामुळे आम्ही भयभीत झालो आहोत, गुरुवारी सकाळी झालेल्या या हल्ल्यात किमान 16 इतर लोक गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय हैतीयन पोलिसांशी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या टोळीतील दोन सदस्यांचा देखील समावेश आहे.
अनेक घरे आणि वाहने जाळण्यात आली
यूएनने दिलेल्या माहितीनुसार या गॅंग हल्यामध्ये लोकांची घरे आणि वाहने देखील जाळण्यात आली आहेत. त्यामुळे रहिवाशांना घरे सोडून पळून जाण्यास भाग पडले आहे. हे हल्ले कॅरिबियन राष्ट्रातील बिघडत चाललेल्या संघर्षाचे एक उदाहरण असल्याचे यूनने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने दिलेल्या माहितूनुसार, सशस्त्र टोळ्या राजधानी पोर्ट-ऑ-प्रिन्सवर नियंत्रण ठेवत आहेत. ही टोळी आसपासच्या भागात पसरत आहेत. यामुळे शेकडो लोक बेघर झाले आहेत.
पंतप्रधान म्हणाले- हा हैती राष्ट्रावर हल्ला आहे
हैतीचे पंतप्रधान गॅरी कोनेल या आपल्या एक्स अकाऊंटवर या हल्ल्यांबाबत एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “असहाय महिला, पुरुष आणि मुलांवरील हा घृणास्पद गुन्हा हा केवळ पीडितांवरच नव्हे तर हैतीच्या संपूर्ण राष्ट्रावर हल्ला आहे,” दरम्यान, सोशल मीडियावर शेअर केलेल्या ऑडिओ संदेशात, त्यांनी म्हटले आहे की, गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्राने मंजूर केलेले ग्रॅन ग्रीफ नेते लक्सन ऍलन यांनी या हल्ल्यांसाठी राज्य आणि पीडितांना दोषी धरले आणि रहिवाशांवरही हल्ले केल आहेत.