हमास आज चार महिला इस्रायली ओलीस सोडणार; त्या बदल्यात इस्रायल करणार 'इतक्या कैद्यांची सुटका ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
हमास : हमास आज चार इस्रायली महिला ओलिसांची सुटका करणार आहे. या चार ओलिसांची 477 दिवसांनंतर सुटका करण्यात येत आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या हल्ल्यादरम्यान गाझामध्ये या चार महिलांचे अपहरण करण्यात आले होते. या सुटकेच्या बदल्यात इस्रायलला डझनभर कैद्यांचीही सुटका करावी लागणार आहे. हमास आज चार इस्रायली महिला ओलिसांची सुटका करणार आहे. त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या चार ओलिसांची 477 दिवसांनंतर सुटका करण्यात येत आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या हल्ल्यादरम्यान गाझामध्ये या चार महिलांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. 477 दिवसांच्या कारावासानंतर चौघांची आज सुटका होणार आहे.
ज्या ओलिसांची सुटका करण्यात येणार आहे त्यांच्या नावांमध्ये लिरी अल्बाग, डॅनिएला गिलबोआ, करीना एरिव्ह आणि नामा लेवी यांचा समावेश आहे. हे चौघे आयडीएफचे पाळत ठेवणारे सैनिक आहेत. त्या बदल्यात इस्रायलला 200 कैद्यांची सुटका करावी लागणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : डोंगरात गिर्यारोहणाचा छंद हिरावून घेईल बाप होण्याचे भाग्य! अभ्यासातून उघड झाली धक्कादायक माहिती
हमासने पाच दिवसांपूर्वी तीन इस्रायली ओलीसांची सुटकाही केली होती. सर्व महिला हमासच्या कैद्यांच्या यादीत होत्या. यामध्ये रोमी गोनेन, एमिली डमारी आणि डोरॉन स्टेनब्रेचर यांचा समावेश होता. त्या बदल्यात इस्रायलने 90 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली. पहिल्या टप्प्यात हमास 33 इस्रायली ओलीसांची सुटका करणार आहे. युद्धविराम करार तीन टप्प्यात पूर्ण होईल.
19 जानेवारीपासून युद्धविराम करार सुरू झाला आहे
युद्धबंदी कराराचा पहिला टप्पा 19 जानेवारीपासून सुरू झाला आहे. या टप्प्यात गाझामध्ये 19 जानेवारी ते 1 मार्च या कालावधीत युद्धविराम असेल. या टप्प्यात हमास 33 इस्रायली ओलीस सोडणार आहे. त्या बदल्यात डझनभर पॅलेस्टिनींना सोडले जाईल. एका इस्रायली ओलीसाच्या बदल्यात 33 पॅलेस्टिनी कैद्यांना सोडावे लागेल. त्याच वेळी, प्रत्येक इस्रायली महिला सैनिकामागे 50 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी लागेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्प यांच्या टीममध्ये भारतीयांचे वर्चस्व; ‘या’ व्यक्तीने केला व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश
सध्या 15 महिन्यांसाठी युद्धावर बंदी आहे
इस्रायल आणि हमास यांच्यातील सहा आठवड्यांची युद्धविराम सहाव्या दिवसात दाखल झाली आहे. रविवारी, युद्धबंदीच्या पहिल्या दिवशी, 90 पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात पहिल्या तीन इस्रायली ओलीसांची सुटका करण्यात आली. या युद्धबंदीमुळे गाझामध्ये 15 महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध सध्या थांबले आहे. गाझामधील 15 महिन्यांच्या युद्धात 47,000 हून अधिक लोक मारले गेले तर हजारो जखमी झाले.