कॅलिफोर्नियात भारतीय तरुणाची निर्दयी हत्या; लघुशंका ठरली जीवघेणी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Indian Killed in America’s California : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका भारतीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शनिवारी ६ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. या घटनेने कॅलिफोर्नियासह तेथील भारतीयांना देखील धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षाच्या सुरक्षा कर्मचारी कपिलची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने भारतही हादरला आहे. कपिलने सार्वजनिक ठिकाणी एका व्यक्तीला लघवी करण्यापासून रोखले. यामुळे त्याला गोळ्या झाडून ठार करण्यात आले. कपिल केवळ आपली ड्यूटी पार पाडत होता, पण याचा मोबदला त्याला आपला जीव गमावून द्यावा लागला.
सोशल मीडियावरील बंदीने हजारो Gen Z चा चढला पारा; नेपाळमध्ये संचार बंदी लागू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल हा मूळचा हरियाणातील जींद जिल्ह्यातील बराह गावचा रहिवासी होता. तो कॅलिफोर्नियामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. दरम्यान ड्यूटीवर असताना त्याने एका व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी लघवी करण्यापासून रोखले. यामुळे त्या व्यक्तीला राग आला. व्यक्तीने रागाच्या भरातून कपिलची निर्दयी हत्या केली. त्याच्यावर धडाधडा गोळ्या झाडल्या. यामुळे कपिलचा जागीच मृत्यू झाला होता. सध्या या घटनेचा तपास सुरु आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
कपिलच्या अकस्मात मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कपिलचे वडील ईश्वर व त्याचे पूर्ण कुटुंब हरियाणामध्ये आहे. त्याचे कुटुंबा शेती करुन उदरनिर्वाह करत आहे. घरची परिस्थिती हालाकीची असल्याने पैसे कमवण्यासाठी कपिल परदेशात गेला होता. गेल्या दोन वर्षांपासून तो अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात राहत होता. येथे सुरक्षा कर्मचारी म्हणून तो काम करत होता.
डॉन्की रुटने कपिलची अमेरिकेत घुसखोरी
मीडिया रिपोर्टनुसार, कपिल धोकादायक मार्गाने अमेरिकेत घुसला होता. कपिल २०२२ मध्ये डॉन्की रुटने (डंकी मार्ग) पनामा जंगल पार करुन, मेक्सिकोच्या सीमा ओलांडून अमेरिकेत घुसला होता. यासाठी तब्बल ४५ लाख रुपये त्याच्या कुटुंबाने मोजले होते. कपिलला अवैध मार्गाने घुसखोरी केल्याच्या कारणास्तव अमेरिकेत अटकही करण्यात आली होती. परंतु कायदेशीर कारवाईनंतर त्याची सुटका झाली आणि तो कॅलिफोर्नियात स्थायिक झाला.
कपिलच्या मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबीयांना अमेरिकेत राहणाऱ्या एका नातेवाईकाने दिली.कपिलच्या मागे, त्याचे आई-वडिल आणि दोन बहिणी असे कुटुंब आहे. यातील एका बहिणीचे लग्न झाले आहे. बराह गावच्या सरपंचांमी सांगितले की, या परिस्थितीत संपूर्ण गाव कपिलच्या कुटुंबासोबत आहे. सध्या कपिलचा मृतदेग भारतात आणण्यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी ईश्वर यांचे संपूर्ण कुटुंबा मागमी करणार आहे. सरकारकडून मदतीची आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
Nepal Protest Gen Z : नेपाळमध्ये सोशल मिडिया बंदीवरून राडा, आतापर्यंत 5 आंदोलकांचा मृत्यू