पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan)यांना सर्व प्रकरणांमध्ये जामीन मंजूर करण्यात आला आहे. माजी पंतप्रधानांच्या अटकेच्या याचिकेवर सुनावणी करताना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांना सर्व प्रकरणांमध्ये जामीन मंजूर केल्याचे सांगण्यात येत आहे. ही बातमी इम्रानच्या समर्थकांसाठी दिलासादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. पण दुसरीकडे लष्कर आणि सरकारचा इरादा खूप मजबूत दिसत आहे.
Imran Khan granted bail in all cases, order not to arrest him in any case filed after May 9: Pakistan’s ARY News and Samaa TV report pic.twitter.com/51UNSDg3h3 — ANI (@ANI) May 12, 2023
एका माहितीनुसार, सरकारकडून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. शाहबाज सरकारने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. त्याचबरोबर लष्कराच्या जवानांना प्रत्येक रस्त्यावर तैनात राहण्यास सांगण्यात आले आहे. शाहबाज सरकार देशात आणीबाणी जाहीर करू शकते (पाकिस्तान सरकार आणीबाणी लागू करू शकते) असे सांगितले जात आहे. असे झाले तर संपूर्ण देशात खळबळ उडेल.






