भारताने रशियाला दिले हे विध्वंसक प्रतिबंधित तंत्रज्ञान; न्यूयॉर्क टाईम्सच्या गंभीर दाव्यावर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टच सांगितलं (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: भारताने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)या भारत सरकारच्या संरक्षण संस्थेने रशियाला संवेदनशील तंत्रज्ञान पाठवल्याचा दावा करणारा न्यूयॉर्क टाइम्सचा अहवाल फेटाळून लावला आहे.भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा अहवाला चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे. अझिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अहवाल राजकीय हेत साध्य करम्यासाठी चुकीच्या तथ्यांना तोडन-मोडून मूलभूत तपासणी न करता सादर करण्यात आला आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, या प्रकरणात HLA ने सर्व आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचे काटेकोर पालन केले आहे. HAL ही एक सरकार कंपनी आहे.भारताच्या कायदेशीर आणि नियामक चौकटीत संरक्षण आणि व्यापारावर कठोर नियम आहेत.यामुळे भारतीय कंपन्यांन्या परदेशी व्यपार करताना त्यांचे कायकोर पालन करतात. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, प्रसिद्ध माध्यम संस्थांकडून अशी अपक्षे आहे की, कोणताही अहवाल प्रसिद्ध करम्यापूर्वी माहिती मूलभूत तपासणी करावी. ही या प्रकरमामध्ये दुर्लक्षित झाला आहे.
न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, युकेच्या रिफॉर्म पार्टी च्या टेकटेस्टकडून 2023-24 दरम्यान सुमारे 2 दशलक्ष डॉलर्स किमतींच्या ट्रान्समीटर, कॉपिकट उपकरणे अँटेना आणि इतर प्रतिबंधित तंत्रज्ञान एका ब्रिटीश एरोस्पेस कपनीमार्फत रशियाला विकण्यात आले आहेत. अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की याच कालावधीत हिंदुस्तान एरोनॉटिक्सने रोसोबोरोनेक्सपोर्टला अशाच प्रकारच्या घटकांच्या किमान 13 शिपमेंट केल्या,यासाी एकूण 14 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त खर्च आला.
एच.आर.स्मिथ ग्रुपने या व्यवहारांना कायदेशीर म्हटले असून याचा उद्देश भारतीय शोध आणि बचाव मोहिमांसाठी मदत करणे असल्याचे स्पष्ट केले आहे. कंनीच्या वकिलांनी, “ही उपकरणे सैन्य वापरासाठी तयार करण्यात आले नाहीत, तर त्यांचे जीवन वाचवण्यासाठी वापरली जात आहेत.” असे म्हटले आहे. शिवाय ब्रिटनच्या रिफॉर्म पार्टीने देखील हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या मते ही एक राकीय खेळी आहे.
भारतानेही पुनरुच्चार केला आहे की, HAL किंवा कोणत्याही भारतीय संस्थेने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केलेले नाही. त्यामुळे न्यूयॉर्क टाइम्सने केलेले दावे चुकीचे आणि अपूर्ण माहितीवर आधारित आहेत.