चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवा? मग घरीच तयार करा ताज्या गुलाबांपासून गुलाबपाणी, जाणून घ्या कृती
जीवनशैलीत होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता आणि कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरासोबतच त्वचेवर सुद्धा त्याचे परिणाम दिसून येतात. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचा निस्तेज होऊन जाते. निस्तेज झालेल्या चेहऱ्यावर पिंपल्स किंवा ऍक्ने आल्यानंतर चेहरा खूप जास्त खराब दिसू लागतो. त्यामुळे वर्षाच्या बाराही महिने त्वचेची काळजी घेणे फार आवश्यक आहे. चेहऱ्यावर आलेले पिंपळ किंवा इतर समस्या कमी करण्यासाठी बाजारातील महागडे स्किन केअर प्रॉडक्ट, फेशिअल किंवा क्लीनअप करून घेतले जातात. पण याचा ग्लो फारकाळ चेहऱ्यावर टिकून राहत नाही. कालांतराने त्वचा पुन्हा एकदा होती तशीच होऊन जाते आणि त्वचेच्या समस्या वाढतात. वारंवार बाजारात उपलब्ध असलेल्या हानिकारक केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर केल्यास त्वचेवर त्याचे परिणाम दिसून येतात.(फोटो सौजन्य – istock)
पूर्वीच्या काळी त्वचेची काळजी घेण्यासाठी नॅचरल पदार्थांचा वापर केला जायचा. त्यातील अतिशय प्रभावी गोष्ट म्हणजे गुलाबपाणी. गुलाब पाण्याचा वापर मागील बऱ्याच वर्षांपासून केला जात आहे. बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे स्किन केअर प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. पण काही प्रॉडक्टमध्ये केमिकल घटकांचा वापर केला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये घरीच गुलाबपाणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले गुलाब पाणी महिनाभर व्यवस्थित टिकून राहते आणि त्वचा अतिशय सुंदर दिसते. नैसर्गिकरित्या बनवलेले गुलाबपाणी त्वचा आतून हायड्रेट करण्यास मदत करते. याशिवाय घरी बनवलेल्या गुलाब पाण्याचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा करू शकता.
गुलाब पाणी तयार करण्यासाठी मोठ्या वाटीमध्ये गुलाबाच्या पाकळ्या पसरवून घ्या. त्यानंतर त्यात दुसरी वाटी ठेवून त्यात पाणी ठेवा आणि झाकण ठेवून मंद आचेवर गॅस ठेवा. पाण्याची वाफ गुलाबाच्या पाकळ्यांमधील पोषक घटक शोषून घेईल आणि गुलाब पाण्याला सुंदर सुगंध येईल. पाणी गरम करायला ठेवल्यानंतर झाकणावर बर्फाचे तुकडे ठेवावेत. यामुळे पाण्याची वाफ बाहेर जाणार नाही. अशा पद्धतीने गुलाबपाणी तयार होईल.
Dark Circles: ८ तास झोपूनही डोळ्यांखाली डार्क सर्कल्स? दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या खरी कारणे
,मोठ्या टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून मंद आचेवर पाण्याला उकळी काढून घ्या. पाण्यातील गुलाबाच्या पाकळ्या पूर्णपणे कोमेजून जाईपर्यंत पाणी गरम करावे. तयार केलेले गुलाब पाणी थंड केल्यानंतर गाळून पूर्णपणे थंड झाल्यास बाटलीमध्ये भरून ठेवा. तयार केलेल्या गुलाब पाण्याचा वापर तुम्ही चेहऱ्यावर लावण्यासाठी लगेच सुद्धा करू शकता. घरी तयार केलेले गुलाब पाणी मेकअप करण्याआधी नियमित चेहऱ्यावर लावल्यास मेकअप जास्त वेळ टिकून राहील आणि त्वचा चमकदार दिसेल.






