India-US Trade Deal : एका बाजूला टॅरिफची धमकी अन् दुसरीकडे भारतासोबत ट्रेड डील पक्की? अमेरिकन राजदूतांचे मोठा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांनी म्हटले की, दोन्ही देश बहुतांश सर्वच मुद्द्यांवर एकमत असून काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबींवर १% चर्चा बाकी आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की उर्वरित मुद्द्यांवरही लवकरच तोडगा काढला जाईल. त्यांनी हा करार दोन्ही देशांसाठी विन-विन असल्याचे सांगितले. परंतु नेमके कोणत्या मुद्द्यांवर करार रखडला याचे तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.
येत्या आठवड्यात दोन्ही देशांमध्ये व्यापार करार अंतिम करण्यासाठी बैठका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर गोर भारताचे वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेणार आहेत. सर्जियो गोर यांच्यासोबत अमेरिकेचे एक व्यापारी प्रतिनीधी मंडळ देखील असणार आहे. या चर्चेनंतर कराराला अंतिम स्वरुप मिळेल अशी आशा गोर यांनी व्यक्त केली.
गोर यांनी भारताच्या वाटाघाटी चर्चेच्या टीमचेही कौतुक केले. त्यांनी म्हटले की, भारताचे प्रतिनीधी देशहित जपत त्यांची भूमिका प्रभावीपणे निभावत आहेत. यामुळे चर्चेला गती आल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्या मार्को रुबियो दौऱ्यादरम्यान झालेल्या फोन कॉलचाही उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, अध्यक्ष ट्रम्पचीही भारतातील लोकांना अमेरिका किती नशीबवान आहेत हे समाजावे अशी इच्छा असल्याचे सांगितले.
याशिवाय त्यांनी युरोपियन युनियनच्या भारतासोबत व्यापार करारावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, युरोपियन युनियनला भारतासोबत व्यापार करार करण्यासाठी १९ वर्षे लागली. परंतु याच्या विपरीत अमेरिकेने अवघ्या दीड वर्षात चर्चा अंतिम टप्प्यात नेली आहे.






