US Iran Ceasefire : Iran Deal वर ट्रम्प यांचा मोठा दावा; 'या' आठवड्याच्या अखेरीस होणार अंतिम करार? नाहीतर... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हाईट हाउसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील करार अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरु असून दोन्ही देश कराराच्या अगदी जवळ पोहोचले आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत करार अंतिम होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले.
मात्र, ट्रम्प यांनी इराणला असाही इशारा दिला की, आठवड्याच्या अखेरीस करार अंतिम न झाल्यास इराणला संपूर्णपणे नष्ट करण्यात येईल. केवळ २-३ आठवड्यांत इराणचा विनाश होउ शकतो असे त्यांनी म्हटले. परंतु, त्यांना कोणत्याही प्रकारची जीवितहानी नको असून शांतता प्रयत्नांद्वारे संघर्ष थांबवण्याची इच्छा ट्रम्प यांनी व्यक्त केली.
याच वेळी ट्रम्प यांनी होर्मुझ(Hormuz) च्या खुली होण्याबाबतही मोठे संकेत दिले. त्यांनी स्पष्ट केले की, करारावर अंतिम स्वाक्षरी होताच होर्मुझची सामुद्रधुनी तातडीने खुली केली जाईल. सध्या अमेरिकन सैन्य समुद्रातील स्फोटके आणि माइन्स हटवण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या दोन्ही देशांत शांतता चर्चा जवळपास यशस्वी झाल्याचे सांगितले जात असले तरी, दोन्ही देशांत इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरुन तणाव कायम आहे. ट्रम्प यांना इराणने कोणत्याही प्रकारची अण्वस्त्रे विकसित करु नये किंवा त्यांचा साठा करु नये असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, इराण अण्वस्त्र बनवण्यासाठी लागणारे साहित्य नष्ट करण्यसाठी पावले उचलतील. मात्र, अद्याप इराणने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
या वाटाघाटी चर्चेत पाकिस्तान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांनी अलीकडेच इराणचे परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यांनी इराणचा प्रस्ताव अमेरिकेसमोर मांडण्याचे कार्य केले. सध्या पाकिस्तानची मध्यस्थी यशस्वी होईल का नाही. ६० दिवसांहून अधिक काळ सुरु असलेला संघर्ष थांबले का याकडे संपूर्ण जगाचे लक्ष्य लागले आहे.
US Iran Conflict : चीनने इराणला केली लष्करी मदत? अखेर अमेरिकेच्या ‘त्या’ दाव्याबद्दल सत्य समोर आलंच
Ans: ट्रम्प यांनी इरासोबतचा शांतता करार अंतिम टप्पात असून आठवड्याच्या अखेरीस पूर्ण होईल असा दावा केला आहे.
Ans: ट्रम्प यांनी शांतता करार अंतिम न झाल्यास इराणवर मोठ्या कारवाईचे संकेत दिले आहेत.
Ans: इराणसोबत शांतता करारावर अंतिम स्वाक्षरी होताच होर्मुझचा मार्ग खुला करण्यात येईल असे ट्रम्प यांनी म्हटले.






