Jora Sidhu: दुबईत पहिल्यांदाच भारतीय टोळ्यांचे रक्तरंजित युद्ध; लॉरेन्स बिश्नोई गटातील झोरा सिद्धूच्या हत्येचा मोठा दावा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
दुबईत भारतीय गँगस्टरांमध्ये पहिल्यांदाच टोळीयुद्ध झाल्याचा दावा; झोरा सिद्धू उर्फ सिप्पीची गळा चिरून हत्या केल्याची माहिती सोशल मीडियावर.
रोहित गोदारा गटाशी संबंधित अकाउंटवरून हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा; सिद्धू दुबईहून धमक्या देत असल्याचा आरोप.
दुबई पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नाही; भारतीय सुरक्षा संस्थाही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून.
Zora Sidhu Dubai encounter : दुबईसारख्या (Dubai) अत्यंत सुरक्षित, कडक कायद्याच्या शहरात पहिल्यांदाच भारतीय गँगस्टरांमध्ये रक्तरंजित टोळीयुद्ध उफाळल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कुख्यात गँगस्टर रोहित गोदारा याच्याशी संबंधित एका सोशल मीडिया अकाउंटवरून लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) गटातील महत्त्वाचा सदस्य झोरा सिद्धू उर्फ ‘सिप्पी’ याची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा थरकाप उडवणारा दावा करण्यात आला आहे. जरी ही माहिती सध्या केवळ सोशल मीडिया पोस्टवर आधारित असली तरी भारत आणि दुबईमधील सुरक्षा संस्थांनी याकडे गंभीरतेने पाहण्यास सुरुवात केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tehran Chaos : पाकिस्तानच्या सीमेवर ‘हा’ देश बांधणार आपली राजधानी; तेहरानमध्ये सध्या परिस्थिती अस्थिर
व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की झोरा सिद्धूची दुबईमध्ये गळा चिरून हत्या करण्यात आली. पोस्टमध्ये थेट शब्दांत लिहिले आहे
“लॉरेन्सचा मुलगा झोरा सिद्धू आज दुबईत संपवला. हे काम आम्ही पूर्ण केले.”
या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की सिद्धू दुबईतून कॅनडा आणि अमेरिकेतील अनेक व्यक्तींना धमक्या देत होता आणि बिश्नोईच्या सूचनांवर टोळीचा ‘हँडलर’ म्हणून काम करत होता.
पोस्टमध्ये आणखी एक महत्त्वाचा आरोप करण्यात आला आहे सिद्धूने काही काळापूर्वी जर्मनीमध्ये गोदाराच्या एका सहकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, आणि ही हत्या त्या ‘बदल्याचा’ भाग म्हणून करण्यात आल्याचा दावा आहे. फक्त रोहित गोदारा नव्हे, तर गोल्डी ब्रार, वीरेंद्र चरण, महेंद्र सरन डेलाना आणि विकी पहेलवान कोटकपुरा यांचीही नावे या पोस्टमध्ये टॅग करण्यात आली आहेत. ही सर्व नावे पंजाब-हरियाणा गँगवॉरमध्ये कुख्यात मानली जातात.
पोस्टमध्ये स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले आहे की , “ज्यांना वाटतं दुबई सुरक्षित आहे, त्यांनी समजून घ्यावं… आमचे शत्रू कुठेच सुरक्षित नाहीत.”
हा इशारा स्वतःच चर्चेचा विषय ठरला असून सुरक्षा तज्ञांच्या मते हा दावा खरा असल्यास दुबईच्या सुरक्षा प्रतिमेलाही धक्का मानला जाईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Delhi Bomb Blast : दिल्ली बॉम्बस्फोटांपासून ते काश्मीरपर्यंत…;पाकिस्तानसोबत ‘हा’ मुस्लिम देशही आहे कटात सामील
महत्त्वाची बाब म्हणजे :
दुबई पोलिसांनी या कथित हत्येबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.
सुरक्षा तज्ञांचे मत आहे की दुबईसारख्या शहरात, जिथे सर्वत्र CCTV देखरेख आणि कठोर कायदे लागू आहेत, तिथे अशा प्रकारची नोंद नसणे हे या दाव्यांवर शंका उपस्थित करते. तथापि, सोशल मीडियावर हा दावा झपाट्याने पसरत असल्याने भारतीय सुरक्षा संस्थांनीही याची पडताळणी सुरू केली आहे.
भारतामधील गँगस्टर नेटवर्क, त्यांच्या परदेशातील हलचाली, हत्यांचे रिमोट-कंट्रोल ऑपरेशन्स या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर NIA, IB आणि इतर तपास यंत्रणांनी या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवल्याचे सूत्रे सांगतात. दरम्यान, काही सुरक्षा विश्लेषकांचे म्हणणे आहे की हा दावा फक्त गँग्समधील मानसिक युद्धाचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दुबई पोलिसांची अधिकृत पुष्टी येईपर्यंत हे संपूर्ण प्रकरण सोशल मीडिया पोस्टवरच आधारलेले आहे. दुबईतील कथित हत्येचा हा दावा कितपत खरा आहे, हे सांगण्यासाठी पोलीस कारवाई वा अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र या दाव्याने भारतीय गँगवॉरचा ‘परदेशी फ्रंट’ अधिक धोकादायक होत चालल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.






