फोटो सौजन्य: सोशल मीडिया
दमास्का: सध्या इराण-इस्त्रायल यांच्यात तीव्र संघर्ष वाढला आहे. इस्त्रायल इराणवर सातत्याने हल्ले करत आहे. इस्त्रायल इराणच्या लष्करी तळांना नष्ट करत आहेत. दरम्यान, एककीकडे इस्त्रायली लष्कराचे इराण हल्ले सुरू असतानाच आता सीरियावरही हल्ले केले आहेत. सीरियाच्या मीडिया रिपोर्टनुसार, इस्त्रायलने आज पहाटेच्या सुमारास दक्षिण आणि मध्य सीरियामत अनेक लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. सध्या सगळीकडे युद्धाची पातळी वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचदरम्यान सिरियाची राजधानी दमास्का येथेही हल्ले झाल्याचे आता समोर आले आहे.
सीरियाची राजधानी दमास्कावरही हल्ले
मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या लष्करी तळांवर इस्त्रायल हल्ले करत असतानाच हे हल्ले करण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, हवाई संरक्षण यंत्रणेने काही इस्त्रायली क्षेपणास्त्रे नष्ट केली आहेत. तसेच सीरीयाची राजधानी दमास्काच्या आसपासच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. इस्त्रायलने काबीज केलेल्या गोलान हाइट्सरून क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहे. मात्र, या हल्ल्यात कोणतेही नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
व्हाईट हाऊसचे वक्तव्य
इराणने इस्त्रायलवर केलेलया हल्ल्यानंतर हे हल्ले करण्यात आले असल्याचे व्हाईट हाऊसने वक्तव्य जारी केले आहे. व्हाईट हाऊसच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रवक्ते सीन सावेट यांनी सांगितले की, इस्रायलचे हे हल्ले स्वसंरक्षणाच्या स्वरूपाचे होते. इराणने 1 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याला दिलेला प्रतिसाद आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, इराणने इस्रायलवर अनेक महिन्यांपासून सातत्याने हल्ले केले आहेत. इस्रायली सैन्याने या हल्ल्यांमुळे इराणच्या लष्करी तळांवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले आहे.
इस्त्रायवर सातत्याने केलेल्या हल्ल्यांचे प्रत्युत्तर
मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने इराणच्या लष्करी तळांवर आणि राजधानी तेहरानच्या आसपासच्या शहरांवर शुक्रवारी रात्री उशिरा बॉम्बस्फोट केले. इस्त्रायली सैन्याने या हल्ल्यांची पुष्टी केली आहे. इस्त्रायली सैन्याने म्हटले आहे की, इराणकडून सतत होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हे हल्ले करण्यात आले. इस्रायलला त्याच्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. यासाठी इ्स्त्रायल आवश्यक ती कारवाई करणार आहे.
सीरियाच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवरही परिणाम होऊ शकतो
सीरियात आणि इराणमध्ये तणाव वाढत असताना, इस्रायलचे हे हल्ले सीरियाच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवरही परिणाम करू शकतात. इराणच्या लष्करी तळांवर झालेले हे हल्ले त्याच्या लष्करी शक्तीवर गंभीर परिणाम करू शकतात. आंतरराष्ट्रीय समुदायाने या घटनेवर लक्ष ठेवले आहे आणि पुढील कारवाईसाठी तयारी सुरू केली आहे. यामुळे सीरियातील स्थिरता आणि शांतीसाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने तणाव कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत असे आवाहन करण्यात आले आहे.