गाझावरील हवाई हल्ल्यात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू; हमासच्या अंताची नेतन्यांहूची योजना (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेरुसेलम: सध्या इस्त्रायल आणि हमास मधील संघर्षाला पुन्हा सुरुवात झाली आहे. 17 जानेवारी रोजी झालेल्या युद्धविराम करारानंतर इस्त्रायलने गाझावर मोठा हवाई हल्ला केला आहे. इस्त्रायल-हमासमधील युद्धबंदीचा टप्पा 01 मार्च 2025 रोजी पूर्ण झाला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शांतता करारावर चर्चा सुरु झाली. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला सर्व इस्त्रायली ओलिसांची सुटका करण्याचा इशारा वारंवार दिला होता. मात्र, हमासने तो मान्य केला नाही. यानंतर इस्त्रायली सैनिकांनी युद्धबंदी कराराचे उल्लंघन करत गाझावर हल्ले सुरु केले.
सध्या इस्त्रायलचे गाझावर तीव्र हल्ले सुरुच आहेत. आतापर्यंतच्या हल्ल्यात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू तीव्र संतापले असून हमासला नष्ट करण्याची त्यांची योजना असल्याचे म्हटले जात आहे.
उत्तर गाझा पट्टी रिकामे करण्याचा इस्त्रायलचा आदेश
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा पट्टीतील उत्तर भाग रिकामे करण्याचे आदेश जारी केले आहे. इस्त्रायलने हमासला संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. इस्त्रायलचे संरक्षण मंत्री इस्त्रायल काट्झ यांनी गाझा ते इजिप्तला जाणारा रफाह क्रॉसिंगर पूर्ण बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. याचा उद्देश रुग्णांना उपचारासाठी पोहोचण्यापर्यंत रोखणे आणि हमासवर दबाव आणणे आहे.
यापूर्वी इस्त्रायलने गाझाला मिळणारी मानतावादी मदतही रोखली होती. इस्त्रायलने म्हटले की, होते की, जोपर्यंत हमास सर्व ओलिसांची सुटका करत नाही, तोपर्यंत कोणतीही मदत पोहोचवली जाणार नाही. तसेच इस्त्रायली कोणत्याही इशाऱ्याशिवाय गाझावर हवाई हल्ले देखील सुरु केले आहेत.
गाझात डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरुन झाले हावाई हल्ले
सध्या गाझात इस्त्रायलचे तीव्र हवाई हल्ले सुरु आहेत. इस्त्रायल आणि हमासमधील युद्धविराम भंग झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या टप्प्यातील अटी मान्य करण्यास हमासने नकार दिला होता. तसेच इस्त्रायलचे पंतप्रधान बेजांमिन नेतन्याहूंनी सर्व इस्त्रायली बंधकांना सोडण्याचा इशारा वारंवार दिला होता, मात्र हमासने तो मान्य केला नाही. याच दरम्यान इस्त्रायलने अमेरिकेकडून गाझात हमासविरिद्ध लष्करी कारवाईची मागणी केली, या मागणीला डोनाल्ड ट्रम्प यांनी हिरवा कंदील दाखवला. यानंतर इस्त्रायलने गाझात हवाई हल्ले सुरु केले, असल्याची माहिती वॉल स्ट्रीट जर्नलने एका इस्त्रायली अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली.
निरापराध लोकांवर हत्या
हमासच्या एका अधिकाऱ्या इस्त्रायलच्या या हल्ल्यांवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय समुदायच्या नैतिकतेची परिक्षा घेतली जात आहे. तसेच गुन्ह्यांना परत करण्याची परवानगी दिली जाक आहे, या हल्ल्यांमुले गाझातील निष्पाप लोकांची हत्या होत आहे. गाझावर ताबा मिळवण्यासाठी निष्पाप लोकंविरुद्ध आक्रमकता दिसून येत आहे.