इस्रायलची गाझात मोठी कारवाई; ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यात सामील असलेल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा (फटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेरुसेलम: गाझामध्ये इस्रायली सैन्याच्या कारवाया सुरुच आहेत. याच वेळी इस्रायलच्या सैन्याने त्यांच्यावर ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांना ठार केले असल्याचे म्हटले. इस्रायलच्या लष्कराने मुजाहिदीन दहशतवादी गटाचा नेता असद अबू शरियाला आणि कुख्यात दहशतवादी महमूद हमीद कुहैलचा देखील खात्मा करण्यात आला असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
इस्रायली सांगतिले की, या दोघांनी इस्रायलवर ७ ऑक्टोबर २०२३मध्ये झालेल्या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका ब जावली होती.अबू शरिया हा हल्ल्याचा नियोजक होता. तर महमूदने हल्ल्या घडवून आणला होता. इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल डिफेन्स फोर्सेस आणि इस्रायल सिक्युरिटी एजन्सीने संयुक्तपणे ही कारवाई केली.
इस्रायल सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, किबुट्झ निर ओझवर हल्ला करणाऱ्या गटाचा अबू शरिया कमांडर होता. किबुट्झ हे लहान इस्रायली समुदाय असून या ठिकाणी अनेक लोक मारले गेल होते. तसेच अनेक लोकांना कैद ठेवण्यात आले होते. शरियाने शिरी एरियल आणि केफिर बिबास यांच्या अपहरण आणि हत्येचा कट देखील रचला असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
दहशतवादी अबू शरिया हा दहशतवादी गटांमध्ये भरती करायचा. तसेच इस्रायली सैनिकांवर हल्ल्याचे नियोजन आणि त्या हल्ल्यांची अंमलबजावणी करण्यात तो सहभागी होती. याशिवाय त्याने दहशतवादी नेटवर्कच्या मध्ये तो प्रभावशाली मानला जायचा. संपूर्ण दहशतवादी संघटनेचा मुख्य नेता आणि संचलाक म्हणून त्याने काम केले होते.
मार्च २०२५मध्ये युद्धबंदीचे उल्लंघन केल्यानंतर इस्रायलने गाझात लष्करी कारवाया सुरु केल्या. यामध्ये ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेणे आणि त्यांना ठार मारणे हा त्यांचा उद्देश होता. आयडीएफ आणि आयएसएने संयुक्तपणे ही करावाई केली. इस्रायलसाठी एक महत्वाचे पाभल मानले जात आहे.
दरम्यान आतापर्यंतच्या इस्रायलच्या हल्ल्यात हजारांहून अधिक निरापराध लोकांचा बळी गेला आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमास आणि त्यांच्या दहशतवादी गटांनी इस्रायलवर मोठा हल्ला केला होता. यामध्येही शेकडो लोकांचा बली गेला. अनेकांना ओलिस ठेवण्यात आले. तेव्हापासून सुरु झालेले या युद्धावर २०२५च्या सुरुवातील अमेरिकेच्या मध्यस्थीने विराम लागला. या युद्धबंदीदरम्यान हमास कैदेत असलेल्यांची सुटका करण्यात आली.
परंतु दुसऱ्या टप्प्यातील अटी मान्य करण्यास हमासने नकार दिला. यामुळे इस्रायलच्या गाझातील कारवाया पुन्हा सुरु झाल्या. परंतु इस्रायलच्या या कारवाईचा फटका गाझातील पॅलेस्टिनी नागरिकांना बसत आहे. लोकांना पायाभूत सुविधा मिळणेही कठीण झाले आहे. हजारो निष्पाप लोकांचा जीव जात आहे. यामुळे जागतिक स्तरावर इस्रायलच्या या कारवाईला तीव्र विरोध केला जात आहे. पंरतु इस्रायलने कारवाय थांबण्यास नकार दिला आहे.