मध्य पूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट! लेबनाॅनवरील हल्ल्यात हिजबुल्लाहच्या प्रमुखाचा खात्मा केल्याचा इस्रायलचा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel attck on Lebnon : बेरुत : मध्य पूर्वेत पुन्हा एकाद युद्धाची आग धगधगण्यास सुरुवात झाली आहे. इस्रायलच्या (Israel) सैन्याने रविवारी (23 नोव्हेंबर) लेबनॉनमध्ये मोठा हल्ला केला आहे. या हवाईआ हल्ल्यात लेबनॉनची राजधानी बेरुतला लक्ष्य करण्यात आले आहे. इस्रायली सैन्याने या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या (Hezbollah) प्रमुखाचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने बेरुतच्या दक्षिणेकडील भागात हा हल्ला केला असून या हल्ल्यात हिजबुल्लाह गटाचा वरिष्ठ सदस्य अली तबाताई यांना ठार केले आहे. गेल्या वर्षी हिजबुल्लाह आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी लागू झाली होती. या युद्धबंदीचे उल्लंघन करत इस्रायलने बेरुतमध्ये मोठा हवाई हल्ला केला आहे. यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा अस्थिरता पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे गाझा पट्टीत हमाससोबत युद्ध सुरु असताना दुसरीकडे हिजबुल्लाह सोबतही इस्रायलने युद्ध पुकारले आहे. यामुळे इस्रायलवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
हल्ल्यात पाच ठार, २० हून अधिक जखमी
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने बेरुतच्या दाहीह भागात दाट लोकवस्तीतील एका रहिवाशी इमारतीवर हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात पाच जण ठार झाल्याचे आणि 20 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या हल्ल्यात इस्रायलचा एक वरिष्ठ कमांडरही ठार झाला असून, हिजुबल्लाहने याची पुष्टी देखील केली आहे. मात्र या कमांडरची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.
इस्रायलीच्या लष्कराने या संबंधी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये सांगण्यात आले आहे की, हिजबुल्लाचे चीफ ऑफ जनरल स्टाफ हैथम अली ताबाताई यांचा बेरुतमध्ये खात्मा करण्यात आला आहे. इस्रायलच्या माहितीनुसार, ताबाताई सीरियामध्ये हिजबुल्ल्हाच्या कारवायांचे नेतृत्व करायचे. १९९० च्या दशकात त्यांना हिजबुल्लाहच्या रडवान फोर्सचे नेतृत्व केले होते.
🔴 ELIMINATED: Haytham Ali Tabatabai, Hezbollah’s Chief of General Staff, in the Beirut area. Tabatabai, a veteran operative since the 1980s, commanded the Radwan Force, led Hezbollah operations in Syria, and entrenched its operational and combat capabilities. During the war… pic.twitter.com/mCllkJOole — Israel Defense Forces (@IDF) November 23, 2025
लेबनॉनमध्ये इस्रायल आणि हिजुबल्लामध्ये युद्धबंदीला एक वर्ष पूर्ण झाली आहे. यानंतर हा पहिलाच सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. यामुळे लेबनॉनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्रायली संरक्षण मंत्री काट्झ यांनी, यामागे त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षेचा हवाला दिला आहे. मात्र या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरुतच्या दाहीह भागात दाट लोकवस्तीतील एका रहिवाशी इमारतीवर हा हल्ला केला आहे.
Ans: इस्रायलच्या बेरुतवरील हल्ल्यात ५ ठार तर २० हून अधिक जखमी झाले आहेत.
Ans: इस्रायलने लेबनॉनवरील हल्ल्यात हिजबुल्लाहाचा हिजबुल्लाचे चीफ ऑफ जनरल स्टाफ हैथम अली ताबाताई ठार झाले असल्याचे म्हटले आहे.






