PM नेतन्याहूंचा भारत दौरा स्थगित; सुरक्षेचा मुद्यांवरुन उठल्या अफवा, इस्रायलने म्हटले... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पंतप्रधान नेतन्याहूंच्या या दौरा स्थगितीच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर अनेक अटकळी बांधल्या जात आहे.
यामध्ये भारतात नुकत्याच झालेल्या दिल्ली बॉम्बस्फोटामुळे सुरक्षेच्या कारणास्तवर नेतन्याहूंचा दौरा पुढे ढकलण्यात आला असल्याचे म्हटले आहे. दरम्यान पंतप्रधान नेतन्याहूंच्या कार्यलयाने हे सर्व दावे फेटाळले आहेत.
इस्रायलचे पंतप्रधानांनी स्वत: याचे स्पष्टीकरण दिले आहेत. त्यांनी भारताला सर्वात सुरक्षित देश म्हटले आहे. तसेच त्यांना भारताच्या सुरक्षा व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचेही म्हटले आहे. नेतन्याहूंनी सांगितले की, सध्या दोन्ही देशांमध्ये समन्वय साधण्यासाधी तारखा निश्चित करण्याचे कार्य सुरु आहे. इस्रायलच्या पंतप्रदान कार्यालयाने म्हटले आहे की, इस्रायलचे भारताशी संबंध आणि पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहूंचे संबंध अधिक चांगले आणि मजबूत आहेत.
इस्रायलच्या पंतप्रधान कार्यलयाने पुढे म्हटले की, नेतन्याहूंनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताच्या सुरक्षेवर पूर्णत: विश्वास आहे. आमच्या एक टीम आधीच दोन्ही नेत्यांच्या भेटीसाठी तारिख निश्चित करण्यावर चर्चा करत आहेत.
काही लोकांनी दावा केला आहे की, नुकतेच दिल्ली झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु इस्रायलने हा दावाही फेटाळला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बेंजामिन नेतन्याहू या वर्षाच्या अखेरीस भारताला भेट देण्याची योजना आकत आहे. परंतु त्यांचा भारत दौरा रद्द होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी २०१८ मध्ये भारताला भेट दिली होती. त्यानंतर त्यांचा हा दौरा होणार होता, जो स्थगित करण्यात आला आहे.
इस्रायल आणि भारतातील संबंध हे १९ च्या दशकापासून आहेत. दोन्ही देशांती राजकीय संबंध १९९२ पासून वेगाने दृढ होत गेले आहेत. संरक्षण, कृषी, आणि आर्थिक सहकार्यावर दोन्ही देशांचे संबंध आधारित आहेत. भारत हा इस्रायलचा १०वा सर्वा मोठा व्यापारी भागीदार आहे. दोन्ही देशातील व्यापार संबंध देखील ६ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचलेले आहेत. इस्रायल आणि भारतामध्ये संरक्षण क्षेत्रातील सहकार्य देखील अत्यंत मजबूत आहे.






