सौजन्य : सोशल मीडिया
पॅलेस्टाईन : इस्रायलकडून लेबनॉनवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. आता सोमवारी बेरूतमधील एका अपार्टमेंटला लक्ष्य केले. ज्यात किमान चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती एएफपीकडून दिली जात आहे. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनी अतिरेकी गट इस्रायलमध्ये घुसल्यानंतर इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यानंतर शहराच्या हद्दीत हा पहिला इस्रायली हल्ला होता.
हेदेखील वाचा : खळबळजनक ! महाविद्यालयाच्या आवारातच विद्यार्थ्याचा खून; कोयत्याने केले सपासप वार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानीला बेरूत विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या कोला येथील सुन्नी बहुल भागातील एका फ्लॅटला या हल्ल्याने लक्ष्य केले. हा फ्लॅट लेबनीज इस्लामी गट जमा इस्लामियाच्या दोन सदस्यांचा होता. ज्याचे मूळ मुस्लिम ब्रदरहूड आहे. एएफपीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि फोटोंमध्ये ड्रोन हल्ल्याने लक्ष्य केलेल्या इमारतीच्या काही भागाचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. या परिसरातून धुराचे लोटही उठताना दिसत आहेत. यानंतर लवकरच, इस्रायली सैन्याने सांगितले की, त्यांच्या लढाऊ विमानांनी लेबनॉनच्या बेका प्रदेशातील डझनभर हिजबुल्लाच्या लक्ष्यांवर हल्ले केले.
‘इस्त्रायली हवाई दलाच्या जेट विमानांनी लेबनॉनमधील बेका येथे शस्त्रे ठेवलेल्या डझनभर लाँचर्स आणि इमारतींवर हल्ला केला. इस्रायल शक्तिशाली हल्ले करत राहील. लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या लष्करी क्षमता आणि पायाभूत सुविधांना हानी पोहोचवत राहील. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने टेलिग्रामवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हेदेखील वाचा : शेतमालकाच्या मुलाची मजूराच्या मुलीवर पडली नजर; लैंगिक अत्याचार केला अन् मुलगी गरोदर राहताच…