इराणच्या एविन तुरुंगावर इस्रायलकडून भीषण हल्ला, हल्ल्याचा थरकाप उडवणारा Video व्हायरल
इस्रायल आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक उग्र होत चालला आहे. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने आता थेट इराणच्या प्रसिद्ध एविन तुरुंगावर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्याचे थरकाप उडवणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. मात्र जीवितहानी किती झाली आहे, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
दरम्यान, या संघर्षात अमेरिका देखील सक्रिय झाली असून, इराणमधील तीन अणुकेंद्र उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. त्यानंतर चिडलेल्या इराणने थेट अमेरिकेच्या लष्करी तळांवर प्रतिहल्ला केला. त्यानंतर लगेचच इस्रायलनेही इराणमधील अनेक ठिकाणांवर भीषण हवाई कारवाया केल्या आहेत.
‼️‼️‼️ Big – The Israeli Air Force is bombing the headquarters of the Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) in Tehran.
The Israel Defense Forces confirm that many high-ranking officials of the IRGC have been killed in the strikes. pic.twitter.com/XeWY2InrsR
— Visioner (@visionergeo) June 23, 2025
तेहरानजवळ सोमवारी दुपारी झालेल्या या हल्ल्यात इस्रायलने एविन तुरुंगाच्या प्रवेशद्वारावर जोरदार बॉम्बहल्ला केला, अशी माहिती समोर आली आहे. हल्ल्यात तुरुंग आणि त्याच्या आसपासच्या परिसराचं मोठे नुकसान झालं असून, विध्वंसाचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. हा तुरुंगात पाश्चात्य देशांच्या कैद्यांना ठेवलं जातं. त्यामुळे या हल्ल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरही विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने हल्ल्याची कबुली दिली असून, या कारवाईत इराणी सरकारच्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचं म्हटलं आहे. हल्ल्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत, ज्यामध्ये आगीचे लोळ, स्फोटाचे आवाज आणि धुळीचे प्रचंड वावटळ पाहायला मिळत आहेत.
४० मिनिटं बॉम्बहल्ला
उत्तर इस्रायलमध्येही इराणकडून जोरदार क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. एश्दोद शहरावर डागलेले क्षेपणास्त्र डॅशकॅममध्ये कैद झाले असून, स्फोट झाल्यानंतर गाड्यांच्या आजूबाजूला दगड, माती आणि इमारतींचे तुकडे आकाशात उडताना दिसत आहेत. सुमारे ४० मिनिटे हा हल्ला सुरू होता.इस्रायल-इराण वाढता संघर्ष आणि अमेरिकेचा सहभाग लक्षात घेता, या भागातील परिस्थिती अधिकच धोकादायक बनत चालली आगे. एविन तुरुंगावर झालेला हल्ला ही या संघर्षातील आणखी एक मोठी आणि चिंताजनक घटना मानली जात आहे.