'या' तीन देशांच्या राष्ट्रपतींची हत्येचा कट रचत आहे अमेरिका; जाणून घ्या कोणते ते? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Donald Trump assassination threats to world leaders 2025 : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने (America) पुन्हा एकदा आपल्या आक्रमक धोरणांनी जगाला हादरवून सोडले आहे. २०२५ च्या अखेरीस, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एकामागून एक तीन देशांच्या सर्वोच्च नेत्यांना खुलेआम धमकावल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. व्हेनेझुएला, इराण आणि कोलंबिया या देशांच्या राष्ट्राध्यक्षांची नावे आता अमेरिकेच्या ‘हिटलिस्ट’वर असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला उघडपणे “प्राण वाचवणे सर्वोत्तम ठरेल” अशा शब्दांत धमकी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना थेट इशारा दिला आहे की, त्यांनी सन्मानाने देश सोडावा, अन्यथा त्यांचे काहीही होऊ शकते. ट्रम्प यांच्या या धमकीमुळे मादुरो इतके धास्तावले आहेत की, त्यांनी आपली सुरक्षा क्युबन एजंट्सच्या हाती सोपवली आहे. ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, मादुरो सध्या कोणत्याही फोनचा वापर करत नाहीत आणि सतत आपली ठिकाणे बदलत आहेत. अमेरिकेला व्हेनेझुएलातील जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यांवर ताबा मिळवायचा आहे, असा आरोप मादुरो यांनी केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Social Change: अजब देश! प्रेयसीला डेट करण्यासाठी सरकार देतंय 31 हजार रुपये; लग्न केल्यास मिळतात 25 लाख, जाणून घ्या नेमकं कारण
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान देखील अमेरिकेच्या रडारवर आहेत. जून २०२५ मध्ये इस्रायलने केलेल्या एका हल्ल्यात पेझेश्कियान थोडक्यात बचावले होते. अमेरिकेची अट आहे की, इराणने आपला अणुसंशोधन कार्यक्रम पूर्णपणे थांबवावा. मात्र, इराणने शरणागती पत्करण्यास नकार दिला आहे. आता सर्वांचे लक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या आगामी बैठकीकडे लागले आहे. असे म्हटले जात आहे की, अमेरिका स्वतःहून युद्ध सुरू न करता इस्रायलच्या माध्यमातून इराणला गुडघ्यावर टेकवण्याचा प्रयत्न करेल.
Iran, China, Cuba: The Real US Overthrow Plot Revealed I outline claims that a coordinated network — allegedly involving Iran-trained operatives, Cuban and Venezuelan fronts, and cartel-linked proxies — is driving a campaign of subversion against the U.S., with China positioned… pic.twitter.com/W3iLtSOmOp — Patrick Byrne (@PatrickByrne) December 20, 2025
credit : social media and Twitter
कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांना ट्रम्प यांनी २३ डिसेंबर रोजी जाहीरपणे बजावले आहे की, त्यांनी स्वतःच्या जीवाची काळजी करावी. अमेरिकेचा असा आरोप आहे की, कोलंबियातून मोठ्या प्रमाणात कोकेन आणि अंमली पदार्थांची तस्करी अमेरिकेत केली जात आहे. “पेट्रो जे करत आहेत ते आम्ही सहन करणार नाही,” असे ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले आहे. अमेरिका आता कोलंबियामध्ये आपल्या मर्जीतील सरकार बसवण्यासाठी गुप्त मोहिमा राबवू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Vijay Mallya : विजय मल्ल्या म्हणाले, ‘फरार हा शब्द काढून टाका’; मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले, ‘आधी भारतात परत या’
राजकीय विश्लेषकांच्या मते, ट्रम्प यांचे हे विधान केवळ धमक्या नसून, त्या देशांच्या अंतर्गत संस्थांमध्ये फूट पाडून सत्तापालट घडवण्याची ही एक पूर्वतयारी आहे. अमेरिका सध्या रशिया-युक्रेन आणि चीनच्या वादात अडकलेली असताना, दक्षिण अमेरिका आणि मध्य पूर्वेतील आपल्या शत्रूंचा नायनाट करण्यासाठी ट्रम्प यांनी हे ‘मास्टर प्लॅन’ आखल्याचे दिसते. या धमक्यांमुळे येत्या काळात हे तीनही देश युद्धजन्य परिस्थितीला तोंड देऊ शकतात.
Ans: ट्रम्प यांनी व्हेनेझुएला (निकोलस मादुरो), इराण (मसूद पेझेश्कियान) आणि कोलंबिया (गुस्तावो पेट्रो) या देशांच्या राष्ट्राध्यक्षांना धमकी दिली आहे.
Ans: मुख्य राग तेलाच्या साठ्यांवर ताबा मिळवणे आणि ड्रग्ज तस्करी रोखणे हा असून, मादुरो यांनी सत्ता सोडावी अशी अमेरिकेची इच्छा आहे.
Ans: इराणचा अणुकार्यक्रम थांबवण्यासाठी अमेरिका आणि इस्रायल एकत्र प्रयत्न करत असून, त्यासाठी नेत्यांना लक्ष्य केले जात आहे.






