अमेरिकेने तयार राहावे! किम जोंग उन चीन दौऱ्यावर; पुतिनही राहणार उपस्थित ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Kim Jong Un China visit : आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहमीच गूढतेचा आव आणणारे आणि क्वचितच परदेश दौऱ्यावर जाणारे उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन पुन्हा एकदा जागतिक माध्यमांच्या केंद्रस्थानी आले आहेत. पुढील आठवड्यात किम जोंग उन चीनच्या बीजिंग शहरात होणाऱ्या भव्य लष्करी परेडला सहभागी होणार आहेत. हा दौरा अमेरिकेसाठी नक्कीच धोक्याची घंटा ठरू शकतो, कारण या समारंभात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचीही उपस्थिती निश्चित झाली आहे.
चीन दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त एका भव्य ‘विजय दिन सोहळ्या’चे आयोजन करत आहे. बीजिंगमध्ये होणाऱ्या या लष्करी परेडला जगभरातील २६ परदेशी नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी खास निमंत्रण दिल्यामुळे किम जोंग उन यांचा या सोहळ्यात सहभाग ठरत आहे. उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, किम ३ सप्टेंबर रोजी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी बीजिंगला जाणार आहेत. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यासह अनेक प्रभावी जागतिक नेत्यांची उपस्थिती असल्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्पच्या ‘या’ दोन चुकांमुळे भारत-चीन आले जवळ; जिनपिंग यांनी भारताला लिहिलेल्या पत्रातील ‘गुपिते’ आली समोर
किम जोंग उन परदेशात फारसे दिसत नाहीत. त्यांचे परदेश दौरे एका हातावर मोजता येतील इतके आहेत. त्यामुळे बीजिंगचा हा दौरा विशेष महत्त्वाचा ठरत आहे. २०१९ नंतर किम जोंग उन पहिल्यांदाच चीनला भेट देत आहेत. त्यामुळे या दौऱ्याचे राजकीय, सामरिक आणि आंतरराष्ट्रीय परिणाम काय होतील याबद्दल जगभरात चर्चेचे वादळ उठले आहे.
उत्तर कोरिया हा असा देश आहे, ज्याने अमेरिकेच्या दबावाला कधीही झुकले नाही. उलट वेळोवेळी अण्वस्त्र चाचण्यांद्वारे अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. दुसरीकडे चीन हा उत्तर कोरियाचा दीर्घकालीन धोरणात्मक भागीदार मानला जातो. दोन्ही देशांमधील व्यापारी आणि लष्करी संबंध मजबूत आहेत. आता किम जोंग उन यांच्या या चीन दौऱ्यामुळे अमेरिका आणि तिचे पश्चिमी सहयोगी नक्कीच सावध झाले आहेत. विशेष म्हणजे, रशियाचे अध्यक्ष पुतिन या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे आधीच अमेरिका आणि पश्चिम जग पुतिनविरोधात एकवटलेले असताना, किम-जिनपिंग-पुतिन त्रिकोण एकत्र येणे वॉशिंग्टनसाठी नक्कीच डोकेदुखी ठरू शकते.
गेल्या काही वर्षांत अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये संवादाची शक्यता वेळोवेळी निर्माण झाली होती. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः किम यांच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यातून फारसे काही साध्य झाले नाही. सध्याच्या घडीला उत्तर कोरियाने स्पष्ट केले आहे की त्यांना अमेरिका किंवा दक्षिण कोरियाशी राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यात रस नाही.
त्यामुळे किम यांचा चीन दौरा हा केवळ प्रतीकात्मक नसून, आंतरराष्ट्रीय स्तरावर एक शक्तिशाली संदेश देणारा ठरत आहे. “आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही कुणाच्याही दबावाखाली येत नाही आणि आमच्यासोबत रशिया-चीनसारखे प्रबळ मित्र आहेत” – हा संदेश जगभरात पोहोचवण्याचा हेतू या दौऱ्यामागे स्पष्टपणे दिसतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : किल ट्रम्प – Nuke India…मिनियापोलिस हल्ल्याचे थरारक सत्य; हल्लेखोराच्या विकृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर VIRAL
युक्रेन युद्धामुळे पाश्चिमात्य जग आणि रशियामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला अमेरिका किंवा प्रमुख युरोपीय देशांचे नेते सहभागी होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे या परेडमध्ये पुतिन आणि किम यांची एकत्र उपस्थिती ही अमेरिकेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.