'दुहेरी क्षेपणास्त्र उत्पादन...' आधी दक्षिण कोरियावर डागले क्षेपणास्त्र, आता व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर, किमनेही दिले आदेश ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
North Korea ballistic missile launch January 2026 news : जगाचे लक्ष सध्या अमेरिका आणि व्हेनेझुएला संघर्षाकडे (Us-Venezuela war) असतानाच, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी आशिया खंडात नव्या युद्धाची ठिणगी टाकली आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ज्या प्रकारे अटक केली, त्या घटनेने किम जोंग उन धास्तावले असून त्यांनी आता आपली सुरक्षा वाढवण्यास सुरुवात केली आहे. रविवारी सकाळी उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या दिशेने समुद्रात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दक्षिण कोरियाचे नवनियुक्त अध्यक्ष ली जे-म्युंग (Lee Jae-myung) रविवारी सकाळीच चीनच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले. विशेष म्हणजे, ते बीजिंगमध्ये चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेऊन उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर चर्चा करणार होते. ली जे-म्युंग यांचे विमान हवेत असतानाच किम जोंग उन यांनी सकाळी ७:५० च्या सुमारास प्योंगयांगमधून क्षेपणास्त्रे डागली. ही क्षेपणास्त्रे ५० किमी उंचीवर पोहोचली आणि त्यांनी ९०० ते ९५० किमीचा प्रवास करून समुद्रात कोसळली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kamala Harris: ‘ड्रग्ज ही केवळ थाप आहे!’ Venezuela कारवाईमागील खरं सत्य कमला हॅरिस यांनी केलं उघड, मादुरोच्या अटकेवर संताप
उत्तर कोरियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने (KCNA) दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग उन यांनी नुकतीच एका मोठ्या शस्त्रास्त्र कारखान्याला भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत आदेश दिले की, “येणाऱ्या काळातील धोके पाहता क्षेपणास्त्रांचे उत्पादन दुप्पट (Double Production) करा.” व्हेनेझुएलात ज्या प्रकारे अमेरिकेने ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला, तसाच काहीसा प्रकार आपल्यासोबत होऊ नये, यासाठी किम आता ‘अॅग्रेसिव्ह डेटरन्स’ (Aggressive Deterrence) धोरणाचा वापर करत आहेत.
North Korea has launched its first ballistic missile of 2026 as its leader, Kim Jong Un, focuses on weapons production. pic.twitter.com/iPOhthTo6r — TaiwanPlus News (@taiwanplusnews) January 4, 2026
credit : social media and Twitter
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेने एका सार्वभौम देशाच्या प्रमुखाला (मादुरो) ज्या प्रकारे बेडरूममधून उचलले, त्यामुळे जगातील सर्व हुकूमशहांचे धाबे दणाणले आहेत. किम जोंग उन यांना सर्वात जास्त भीती वाटते ती म्हणजे अशाच प्रकारच्या ‘कापसासारख्या हलक्या’ (Stealth) मोहिमेची. त्यामुळेच, त्यांनी केवळ क्षेपणास्त्र चाचणीच केली नाही, तर चीनलाही असा संदेश दिला आहे की, “जर तुम्ही दक्षिण कोरियाशी जवळीक साधली, तर उत्तर कोरिया शांत बसणार नाही.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Maduro Arrested: हुकूमशहांचा काळ जवळ! अमेरिकेची पुढची शिकार होणार ‘Putin’; झेलेन्स्की यांच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
या क्षेपणास्त्र चाचणीनंतर जपानचे संरक्षण मंत्री शिंजीरो कोइझुमी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “उत्तर कोरियाच्या या कृतीमुळे जगाच्या शांततेला धोका निर्माण झाला आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. दक्षिण कोरियाने तातडीने राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची (NSC) बैठक बोलावली असून किम जोंग उन यांच्या या चिथावणीखोर पावलावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत चर्चा करण्याची मागणी केली आहे.
Ans: उत्तर कोरियाने ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:५० वाजता दक्षिण कोरियाच्या दिशेने अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली.
Ans: किम यांनी शस्त्रास्त्र उत्पादकांना क्षेपणास्त्रांचे उत्पादन दुप्पट (Double Capacity) करण्याचे आणि तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगत शस्त्रे बनवण्याचे आदेश दिले आहेत.
Ans: दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्युंग सध्या चीनच्या दौऱ्यावर असून ते तिथे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत.






