'सामान्य महिलांचे व्हिडिओ बाहेर येतात, मग नेत्यांचे कुठे जातात?' रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांना बोचरा सवाल
याच मोहिमेचा भाग म्हणून सोमवारी रोहित पवार यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी यादव यांच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे सुपूर्द केली आणि अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर संसदेत भूमिका मांडण्याची विनंती केली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवारांनी ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीच्या कार्यपद्धतीवर आणि विमान अपघातातील संशयास्पद बाबींवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत.
Ajit Pawar Plane Crash: अजित पवार अपघात प्रकरणाची चर्चा 3 दिवस पुढे ढकलली; राष्ट्रवादीचे नेते नाराज
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक दावे केले आहेत. अपघाताच्या वेळी दृश्यमानता (Visibility) केवळ ३,००० फूट होती; सामान्यतः ५,००० फुटांपेक्षा कमी दृश्यमानता असताना वैमानिक उड्डाण टाळतात. मग दृश्यमानता कमी असतानाही व्ही. के. सिंह यांनी कॅप्टन कपूर यांना विमान उडवण्याचे निर्देश कसे दिले, असा संशय पवारांनी व्यक्त केला आहे.
रोहित पवार म्हणाले की, “कंपनीचा मालक व्ही. के. सिंह यांचे ‘सीडीआर’ (CDR) तपासून त्या दिवशीचे संभाषण समोर आणले पाहिजे. वैमानिक कपूर यांच्या वैद्यकीय अहवालात ड्रग्स, दारू किंवा विषाचे कोणतेही अंश आढळलेले नाहीत. मग त्यांनी असा धोकादायक निर्णय का घेतला? त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का? तसेच व्ही. के. सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. या प्रकरणाच्या मुळाशी जाणे आवश्यक असल्याचेही त्यांनी ठामपणे मांडले.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आता प्रफुल्ल पटेल यांच्यावरही निशाणा साधला आहे. व्हीएसआर कंपनीचे मालक आणि त्यांचा मुलगा रोहित सिंह यांच्या राजस्थानमधील विवाह सोहळ्याला प्रफुल्ल पटेल उपस्थित होते का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
रोहित पवार म्हणाले की, “जर तुम्ही त्या लग्नाला उपस्थित होतात, तर तिथे इतर कोणते नेते आणि कोणत्या पक्षाचे लोक आले होते, याची माहिती महाराष्ट्रासमोर मांडावी. तुम्ही खरोखरच ‘अजितदादा प्रेमी’ आहात की स्वार्थी, हे आता स्पष्ट करण्याची वेळ आली आहे. यावर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडावी अशी महाराष्ट्राला अपेक्षा आहे.” रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे संबंधित विवाह सोहळ्यातील राजकीय नेत्यांच्या उपस्थितीबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, आता या प्रकरणात पुढे काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mr. प्रफुल पटेल जी (माजी केंद्रीयनागरी उड्डाणमंत्री) आपणास विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताला / घातपातला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल ते आपण लोकांना सांगावं.. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, हे महाराष्ट्राला दाखवून द्या… उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल, ही अपेक्षा..!






