Middle East War : 'आत्मसमर्पण करा अन्यथा' ; तेहरानवरील हल्ल्यानंतर ट्रम्प गरजले; खामेनेईंना दिला अंतिम इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ट्रम्प यांनी इराणला (Iran) अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखण्याबद्दल बोलले आहे. त्यांनी खामेनेईंना आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. तसेच इराणचा अणु कार्यक्रम बंद करण्याचे संकेतही दिले आहे. अन्यथा अमेरिकेच्या घातक हल्ल्यांना सामोरे जावे लागेल अस त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी इराणविरोधी युद्धाची घोषणा करताना म्हटले की, आमचे युद्ध इराणच्या खामेनी सरकारकडून निर्माण झालेल्या धोक्याला दूर करुन अमेरिकेच्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा हेतूसाठी आहे. इराण कोणत्याही परिस्थिती अण्वस्त्रे बाळगू शकत नाही असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
इराणी राजवटीतडून येणाऱ्या धोक्यांना दूर करण्यासाठी हल्ले केले जात असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. त्यांनी म्हटले की, इराणवरील या लष्करी कारवाईमुळे अमेरिकन सैनिकांचे नुकसान होउ शकते. इराणी राजवट आमच्या सैनिकांना मारण्याचा प्रयत्न करत शकतो. यामुळे भविष्यातील धोके टाळण्यासाठी हे युद्ध पुकारण्यात आले असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
याच वेळी ट्रम्प यांनी इराणच्या क्षेपणास्त्र उद्योग आणि नौदलला संपवण्याचा इशाराही दिला आहे. ट्रम्प यांनी इराणच्या प्रॉक्सी संघटनांना देखील उखडून टाकण्याचा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.
इस्रायलने (Israel) इराणची राजधानी तेहरानवर अनेक ठिकाणी हल्ले केले आहे. यामध्ये गुप्तचर मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि अणु उर्जा केंद्रांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच सय्यद खानदान भागातही भीषण स्फोट झाले आहेत. यामुळे इराणमध्ये संतापाचे वातावारण असून इराणने देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
VIDEO | US President Donald Trump says, “A short time ago, the US military began major combat operations in Iran. Our objective is to defend the American people by eliminating imminent threats from the Iranian regime, a vicious group of very hard terrible people. Its menacing… pic.twitter.com/pbAtB7MtHN — Press Trust of India (@PTI_News) February 28, 2026
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणकडून अमेरिकेला भविष्यात निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी केला असल्याचे म्हटले आहे.
Ans: ट्रम्प यांनी इराणला आत्मसमर्पण करण्याचा आणि अण्वस्त्र कार्यक्रम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
Ans: इराणने इस्रायली हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून विनाशकाही प्रत्युत्तर देण्याचे म्हटले आहे.






