नेपाळमध्ये पर्यटन कार्यक्रमारम्यान दुर्घटना; हायड्रोजनने भरलेला फुगा फुटला अन्..., VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काठमांडू: नेपाळच्या पोखरा शहरात पर्यटन वर्ष 2025च्या उद्घाटन समारंभात शनिवारी (15 फेब्रुवारी) एक दुर्घटना घडली. या कार्यक्रमाच्यावेळी हायड्रोयजन गॅसने भरलेल्या फुग्यांचा स्फोट झाला. या दुर्घटनेत नेपाळचे उपपंतप्रधान विष्णु पौडेल आणि पोखरच्या महापौर धनराज आचार्य किरकोळ जखमी झाले. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर उपपंतप्रधान आणि महापौरांना तातडीने काठमांडूला नेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच कास्की जिल्ही पोलिस कर्मचारी कार्यालयाचे पोलिस अधीक्षक श्यामनाथ ओलिया यांनी सांगितले की, पुढील उपचारासाठी त्यांना काठमांडू हलवण्यात आले आहे.
बेलुन फुटेर आगो सल्किँदा अर्थमन्त्री विष्णु पौडेल र पोखरा महानगरपालिकाका प्रमुख धनराज आचार्य घाइेत भएका छन्। pic.twitter.com/ECIt4H3kuo
— Bipin Sapkota (@bipinsapkota213) February 15, 2025
कसा झाला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात पोखरा पर्यटन वर्षाच्या उद्घाटन समारंभादरम्यान झाला. उद्घाटनाच्या वेळी फुगे सोडण्यात येणार होते, त्यादरम्यान फुगे फायर पॉपर्सच्या संपर्कात आले आणि स्फोट झाला. यामुळे उपपंतप्रधान पौडेल आणि महापौर आचार्य किरकोळ भाजले गेले. स्फोटानंतर लगेचच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.
घटना कॅमेरात कैद
ही घटना पोखरा महानरगपालिकेच्या अधिकृत सोशल मीडियावर लाइव्ह स्ट्रीममध्ये कैद झाली. यामध्ये उपपंतप्रधान विष्णु पौडेल स्फोटानंतर धावताना दिसले. महापौर धनराज आचार्य यांनीही मंचावरून पळ काढला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
तसेच उपपंतप्रधान विष्णु पौडेल आणि महापौरांना तातडीने हेलिपॉप्टरने काळमांडूला नेण्यात आले. काठमांडूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कशी लागली आग?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, एका स्वयंचलित स्विचमुळे आग लागली आणि ती हायड्रोजन गॅसने भरलेल्या फुग्यांपर्यंत पोहोचली. हायड्रोजन अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे लगेचच स्फोट झाला. ही दुर्घटना सुरक्षा उपायांतील ढिसाळपणामुळे घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. सार्वजनिक समारंभांमध्ये हायड्रोजन गॅसचा योग्य प्रकारे वापर होणे आवश्यक आहे.
या दुर्घटनेनंतर नेपाळमधील सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून आगामी सार्वजनिक कार्यक्रमांसाठी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.