फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी (8 नोव्हेंबर) संयुक्त राष्ट्र महासभेत विशेष राजकीय आणि डिकॉलोनायझेशन बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान संयुक्त राष्ट्रात जम्मू-काश्मीरबाबत खोटे दावे करणाऱ्या पाकिस्तानला भारताने स्पष्ट इशारा दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या विशेष राजकीय आणि डिकॉलोनायझेशन समितीच्या बैठकीत पाकिस्तानला ठाम प्रत्युत्तर दिले. त्रिवेदी यांनी म्हटले की, “जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील.”
पाकिस्तानच्या अशा खोट्या दाव्यांमुळे वास्तव बदलणार नाही
मिळालेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबरला न्यूयॉर्क येथे झालेल्या या बैठकीत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या लष्करी निरीक्षक गटाचा (UNMOGIP) उल्लेख करून जम्मू-काश्मीर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. यावर खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी स्पष्ट केले की, जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडेच निवडणुका झाल्या असून जनतेने लोकशाही मार्गाने नवीन सरकार निवडले आहे. पाकिस्तानच्या अशा खोट्या दाव्यांमुळे वास्तव बदलणार नाही आणि त्यांनी खोटे बोलणे थांबवावे, असा इशारा त्यांनी दिला.
संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेचा मुद्दा उपस्थित
याशिवाय सुधांशू त्रिवेदी यांनी असेही स्पष्ट केले की, पाकिस्तानचे प्रयत्न संयुक्त राष्ट्राच्या महत्त्वपूर्ण मंचावरून जागतिक लक्ष विचलित करण्यासाठी आहेत. यावेळी पाकिस्तानकडून 1948 साली स्थापन केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे हे आज कालबाह्य ठरले असल्याचे नमूद केले. त्यांनी शिमला करारानंतर अस्तित्वात आलेल्या नियंत्रण रेषेचा उल्लेख करून UNMOGIP ची उपयुक्तता संपल्याचेही सांगितले.
While discussions in United Nations on UN Peacekeeping operations when the representative from Pakistan speaking on the same subject of UN peacekeeping, tried to digress the subject and unnecessarily mentioned that Pakistan’s involvement with UN peacekeepers started when UN has… pic.twitter.com/kbpycmEX2u
— Dr. Sudhanshu Trivedi (@SudhanshuTrived) November 9, 2024
जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग
या मुद्द्यावर ट्विटरवर पोस्ट करताना त्रिवेदी यांनी पाकिस्तानच्या प्रतिनीधीच्या प्रयत्नांना उघडपणे उत्तर दिले. त्यात त्यांनी म्हटले की, “जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील.” त्यांच्या या प्रतिउत्तरात भारतीय संसदेतील अन्य सदस्य, काँग्रेसचे राजीव शुक्ला, द्रमुकचे तिरुची शिवा आणि बीजेडीचे सस्मित पात्रा हे नेतेही सहभागी होते. भारताच्या या ठाम भूमिकेमुळे पाकिस्तानला स्पष्ट संकेत मिळाला आहे की, भारतासाठी जम्मू-काश्मीरचा प्रश्न संपला आहे आणि तो केवळ भारताचा आंतरर्गत भाग आहे.