Nostradamus Prediction: न्यू नॉस्ट्राडेम्सची भविष्यवाणी उतरली प्रत्यक्षात; भारतीय विद्येचा आहे निकटचा संबंध (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि नवे नॉस्ट्राडेमस क्रेग हॅमिल्टन पार्कर यांनी केलेल्या भविष्यवाण्या सतत चर्चेचा विषय बनत आहेत. त्यांनी आपल्या अनेक भाकितांनी जागतिक स्तरावर खळबळ उडवून दिली आहे. अलीकडेच त्यांनी, एक मोठा ऑइल टॅंकर अपघाताचा बळी ठरु शकतो अशी भविष्यवाणी केली होती. ही भविष्यवाणी 11 मार्च रोजी खरी ठरली. 11 मार्च रोजी उत्तर सुद्रात एक मोठा सागरी अपघात झाला. यानंतरच त्यांच्या भाकितांची चर्चा जगभर सुरु झाली.
अलीकडेच एक एमव्ही सोलॉन्ग हे मालवाहू जहाज एमव्ही स्टेना इमॅक्युलेट या अमेरिकेच्या तेल टॅंकरला धडकले. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. टॅंकरमध्ये 18 हजार टन जेट इंधिन होते, यामुळे मोठा भडका उडाला. इतका भीषण अपघात होता की, अगदी अंतराळातून देखील आगीच्या धुरांचे लोट दिसून आले.
काय होते नॉस्ट्राडेमसचे भाकित?
जगप्रसिद्ध मानशास्त्रज्ञ आणि नवे नॉस्ट्राडेमस क्रेग हॅमिल्टन पार्कर यांंनी 04 मार्च रोजी केलेल्या भविष्यवाणीनुसार, एक तेल टॅंकरचा अपघात होणार होता. त्यांनी म्हटले होते की, मी एक तेल टॅंकर संकटात सापडलेले पाहिले. लवकरच तेल टॅंकरची समस्या उत्पन्न होणार आहे. त्यांनी म्हटले की, एक जहाज संकटात सापडलेले मी पाहिले, एकतर ते तेल टॅंकर अेल किंवा प्रवासी जहाज असेल, असे त्यांनी म्हटले होते.
त्यानंतर 11 मार्च रोजी उत्तरी समुद्रात एक तेल टॅंकर आणि मालवाहू जहाजाची जोरदार धडक झाली. यामध्ये बचाव पथकाच्या सहाय्याने सोलॉन्गच्या 13 क्रू मेंमबर्सना वाचण्यात यश आले, तर एकाचा दुर्दैवी मृत्यू या अपघातात झाला. तर स्टेना इमॅक्युलेटच्या 13 क्रू मेंमबर्सना वाचण्यात आले.
डोनाल्ड ट्रम्प बद्दलचीही भाकिते ठरली खरी
क्रेग हॅमिल्टन पार्कर यांनी केलेली अनेक भाकिते खरी ठरली आहेत. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बद्दलही काही भविष्यवाण्या केल्या होत्या. यामध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पेनसिलव्हेनियाती प्रचार रॅलीदरम्यान ट्रम्प यांच्यावर झालेला हल्ल्याचेही भाकित त्यांनी केले होते. त्यांच्या या भविष्यवणीनंतर दोन दिवसांतच ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तेव्हापासून क्रेग हॅमिल्टन पार्क आणि त्यांच्या भविष्यवाण्या चर्चेत येऊ लागल्या.
भारताशी काय आहे संबंध?
क्रेग हेमिल्टन पार्कर यांनी दावा केला आहे की, त्यांनी भविष्यवाणी करायला भारताकडून शिकली आहे. त्यांनी म्हटले की, वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी भारतीय उपखंडाला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी प्राचीन भारतीय भविष्यवाणी पद्धत शिकली. स्थानिक ज्योतिष तज्ज्ञांनकडून प्रेरणा घेतली आणि स्वत:ची प्रॅक्टिस सुरु केली. त्यांचे नाव फ्रेंच ज्योतिषी आणि वैद्य नोस्ट्राडेमस यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.