नीता अंबानींचा अमेरिकेत डंका! शिक्षण-आरोग्य आणि इतर क्षेत्रातील कामांसाठी गव्हर्नरकडून सन्मान (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मुकेश अंबानींच्या पत्नी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी यांना एक आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. सध्या त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी अमेरिकेच्या मॅसाचुसेट्स राज्याच्या गव्हर्नरकडून सन्मानित करण्यात आले आहे. नीता अंबानी यांनी शिक्षण, आरोग्यसेवा, महिला सक्षमीकरण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून यामुळे लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहेत. यामुळे सध्या त्यांची सगळीगृकडे वाह वाह होत आहे.
बोस्टनमध्ये पारंपारिक लूक
बॉस्टन येथे आयोजित एका कार्यक्रमात नीता अंबानी यांनी भारताच्या समृद्ध कलात्मक वारशाचे प्रतीक असलेली शिकारगाह बनारसी साडी परिधान केली होती. ही साडी हाताने विणलेली असून पारंपरिक कोन्या डिझाईन आणि सूक्ष्म बुनकामासाठी ओळखली जाते. त्यांच्या या लूकने भारतातील हस्तकलेच्या कौशल्याला जागतिक व्यासपीठावर अधोरेखित केले.
Reliance Foundation Founder-Chairperson Nita Ambani was conferred with the Governor’s Citation by Maura Healey, Governor of Massachusetts, recognizing her as a visionary leader, compassionate philanthropist, and true global changemaker. The citation honours Ambani’s lifelong… pic.twitter.com/sgy6Wp3zuT
— ANI (@ANI) February 16, 2025
इतर अवॉर्ड्स
नीता अंबानी यांना नुकताच इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड्स (IBLA) च्या 20व्या आवृत्तीत ‘ब्रँड इंडिया मध्ये उत्कृष्ट योगदान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (USISPF) नेही 2023 मध्ये त्यांना परोपकार आणि कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वासाठी ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड दिला आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) च्या सदस्य म्हणून त्यांनी 40 वर्षांच्या कालावधीनंतर भारतात IOC चे अधिवेशन आयोजित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. हे अधिवेशन ऑलिंपिक चळवळीचे सर्वोच्च निर्णय घेणारे व्यासपीठ मानले जाते.
नीता अंबानींचे साड्यांवरील प्रेम
नीता अंबानी यांची साड्यांबद्दलची आवड खूप प्रसिद्ध आहे. अलीकडेच ब्लूमबर्ग टेलिव्हिजनवरील एका मुलाखतीत त्यांनी पारंपरिक फुलांच्या जरीच्या काठांनी सजवलेली आणि नाजूक सोनेरी कढाई असलेली साडी परिधान केली होती. याशिवाय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी वॉशिंग्टनमध्ये आयोजित खास रिसेप्शनमध्येही त्यांनी मास्टर कारीगर बी. कृष्णमूर्ती यांनी विणलेली पारंपरिक कांचीपुरम सिल्क साडी नेसली होती.
नीता अंबानी यांचे सामाजिक योगदान, महिला सक्षमीकरणासाठी समर्पण, तसेच भारतीय सांस्कृतिक परंपरांचे जागतिक पातळीवर केलेले सादरीकरण यामुळे त्या एक आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात.