ड्रोन घुसखोरीच्या मुद्द्यावर किम जोंग उनच्या बहिणीने पुढाकार घेतला, दक्षिण कोरियाला थेट इशारा दिला ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Kim Yo-jong warning to South Korea January 2026 : कोरियाई द्वीपकल्पावर पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले आहेत. उत्तर कोरियाने (North Korea) असा खळबळजनक दावा केला आहे की, दक्षिण कोरियाने (South Korea) जानेवारीच्या सुरुवातीला त्यांचे ड्रोन उत्तर कोरियाच्या हद्दीत पाठवून गुप्तहेरगिरी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने संतप्त झालेल्या किम जोंग-उन यांच्या शक्तिशाली भगिनी किम यो-जोंग यांनी दक्षिण कोरियाला थेट आणि उघड धमकी दिली आहे. “पुन्हा असे धाडस केल्यास दक्षिण कोरियाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल,” असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने (KCNA) दिलेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी २०२६ रोजी दक्षिण कोरियाच्या गँगवॉन काउंटीमधून एक ड्रोन उत्तर कोरियाच्या केसोंग (Kaesong) शहरात घुसला होता. उत्तर कोरियाच्या लष्कराने इलेक्ट्रॉनिक युद्ध तंत्राचा (Electronic Warfare) वापर करून हे ड्रोन पाडले. उत्तर कोरियाचा दावा आहे की, या ड्रोनमधील कॅमेऱ्यांत युरेनियम खाणी, लष्करी चौक्या आणि केसोंग इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सचे फोटो सापडले आहेत. ही सरळ सरळ हेरगिरी असल्याचे प्योंगयांगने म्हटले आहे.
किम यो-जोंग यांनी दक्षिण कोरियाच्या स्पष्टीकरणावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले की, “दक्षिण कोरियाचे सैन्य हे ड्रोन आमचे नसल्याचे सांगून हात झटकत आहे. पण तो ड्रोन लष्करी असो वा नागरी, आमच्या हवाई हद्दीचे उल्लंघन झाले आहे, हे सत्य आहे.” त्यांनी पुढे इशारा दिला की, जर दक्षिण कोरियाने नागरी संघटनांच्या नावाखाली हे प्रकार सुरू ठेवले, तर उत्तर कोरिया देखील त्यांच्या नागरी संघटनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ड्रोन (UAVs) दक्षिण कोरियात पाठवेल, जो एक प्रकारचा मोठा प्रतिहल्ला असेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Attack: Venezuelaच्या सैनिकांनी केल्या रक्ताच्या उलट्या; कोणते होते ‘ते’ रहस्यमय शस्त्र ज्याने भेदली मादुरोंची सुरक्षायंत्रणा?
दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने उत्तर कोरियाचे सर्व आरोप ‘पूर्णपणे असत्य’ ठरवले आहेत. संरक्षण मंत्री अह्न ग्यु-बॅक यांनी स्पष्ट केले की, उत्तर कोरियाने प्रसिद्ध केलेले ड्रोनचे फोटो दक्षिण कोरियाच्या लष्कराकडे असलेल्या कोणत्याही मॉडेलशी जुळत नाहीत. दक्षिण कोरियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दक्षिण कोरियाच्या मते, हा उत्तर कोरियाचा एक बनाव असू शकतो किंवा कदाचित एखाद्या खाजगी संस्थेचे हे काम असू शकते, ज्याचा लष्कराशी संबंध नाही.
North Korea increased pressure on South Korea over the weekend, claiming that South Korean drones were being flown over North Korean territory, prompting an immediate denial from Seoul, which has been working for a breakthrough in deadlocked dialogue with Pyeongyang.
… pic.twitter.com/xf8nYUsztx — The Korea Herald 코리아헤럴드 (@TheKoreaHerald) January 11, 2026
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran US Conflict : इराणची ‘डेथ वॉरंट’ घोषणा; अमेरिका आणि इस्रायल ‘हिट लिस्ट’वर; मध्यपूर्वेत युद्धजन्य हालचालींना वेग
केसोंग हे शहर उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवर असून ते ऐतिहासिकदृष्ट्या संवेदनशील मानले जाते. यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्येही अशाच प्रकारची ड्रोन घुसखोरी झाल्याचा दावा उत्तर कोरियाने केला होता. तज्ज्ञांच्या मते, उत्तर कोरिया अशा घटनांचा वापर करून दक्षिण कोरियाला ‘सर्वात मोठा शत्रू’ म्हणून जगासमोर दाखवू इच्छित आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संवाद पूर्णपणे थांबला असून लष्करी हालचाली वाढल्या आहेत.
Ans: दक्षिण कोरियाने जानेवारीच्या सुरुवातीला हेरगिरी करण्यासाठी उत्तर कोरियाच्या केसोंग शहरात ड्रोन पाठवून हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
Ans: त्यांनी सांगितले की जर पुन्हा अशी चिथावणी दिली, तर दक्षिण कोरियाला याचे भयानक परिणाम भोगावे लागतील आणि उत्तर कोरिया देखील प्रत्युत्तरादाखल मोठ्या संख्येने ड्रोन पाठवेल.
Ans: दक्षिण कोरियाने हे आरोप फेटाळले असून, ते ड्रोन लष्करी नसल्याचे म्हटले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.






