Pakistan Army Chief: 'चेहऱ्यावर तणाव आणि डोळ्यात भीती...' भारताच्या ठोस कारवाईमुळे पाक लष्करप्रमुख असीम मुनीर चिंतेत ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Pakistan Army Chief warning : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने घेतलेल्या कठोर पावलांमुळे पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे. विशेषतः पाक लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर या कारवाईचा परिणाम स्पष्टपणे जाणवत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव आणि डोळ्यांत दिसणारी भीती यावरून पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाची चिंता लपून राहिलेली नाही.
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर हल्ला केला, ज्यात काही जणांचा क्रूरपणे बळी गेला. या अमानुष कृत्याचा प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकारने कठोर भूमिका घेतली असून, दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठिराख्यांना धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तान लष्कराने रावळपिंडीमध्ये महत्त्वाची ‘कॉर्प्स कमांडर परिषद’ आयोजित केली. या बैठकीस जनरल असीम मुनीर आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते. मात्र, या बैठकीत उपस्थित सर्व लष्करी अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता, तणाव आणि अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत होती.
या बैठकीशी संबंधित एका छायाचित्रात टेबलावर ठेवलेली डायरी, कागदपत्रे आणि लॅपटॉप यावरून सध्याच्या परिस्थितीबाबत गंभीर चर्चा होत असल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः असीम मुनीर यांचे चेहऱ्याचे बदलते रंग, खोल गेलेले डोळे आणि चेहऱ्यावरचे तणावाचे रेषा यांनी त्यांच्या अंतर्गत घबराटीची साक्ष दिली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Cosmos 482 पृथ्वीवर परतणार! 50 वर्षांनंतर सोव्हिएत यानाचा पृथ्वीवर परतणार, भारताला किती धोका?
भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला, जो पाकिस्तानसाठी अत्यंत धोकादायक आणि अस्वस्थ करणारा आहे. या कराराखाली पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चेनाब नद्यांचे पाणी मिळत होते. भारताने हा करार स्थगित करताच पाकिस्तानचे २४ कोटी नागरिक जलसंकटाच्या छायेत गेले आहेत, अशी चिंता असीम मुनीर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “भारत पाण्याचा वापर आता शस्त्र म्हणून करत आहे,” आणि ही कृती युद्धसदृश आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ही कृती प्रादेशिक स्थैर्य धोक्यात आणणारी असून भारताच्या निर्णयामुळे दहशतवादी कृत्यांच्या समर्थनाची किंमत पाकिस्तानला चुकवावी लागत आहे.
भारत सरकारने यानंतर नियंत्रण रेषेवरील सैनिकी तैनाती आणखी मजबूत केली आहे. रात्रीच्या वेळी ड्रोनच्या साहाय्याने सतत गस्त ठेवली जात आहे, तर अनेक ठिकाणी नवीन तंत्रज्ञानावर आधारित देखरेख प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, “भारत आता कोणतेही दहशतवादी कृत्य सहन करणार नाही. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांना थेट उत्तर दिले जाईल.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताला ‘Hawkeye 360’ प्रणालीसाठी अमेरिकेची मान्यता; सागरी सुरक्षेत होणार क्रांतिकारी बदल
भारताच्या कठोर पावलांमुळे पाकिस्तानला मोठ्या आंतरराष्ट्रीय आणि आंतरिक दबावाला सामोरे जावे लागत आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने जो धाडसी आणि ठाम निर्णय घेतला आहे, त्यातून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या शक्तींना कडक संदेश मिळाला आहे – “आता बस झालं!”
या साऱ्या घडामोडींमुळे पाक लष्करप्रमुख असीम मुनीर आणि त्यांचे सहकारी पूर्णपणे दबावाखाली आहेत, याबाबत कोणतेही दुमत नाही. भारताची प्रतिउत्तर देण्याची तयारी, आणि सिंधू पाणी करारासारखे निर्णायक निर्णय – हे सारे दहशतवादविरोधी लढ्यात भारताचा नव्या युगातला निर्धार दर्शवतात.