पाकिस्तानचे पंतप्रधानांनी चुकून इस्रायल-इराण युद्धावर लिहिले 'I Condom'? काय आहे व्हायरल पोस्ट मागील सत्य (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan News Marathi : इस्लामाबाद : सध्या मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायलमधील युद्ध तीव्र भडकले आहे. शुक्रवारी १३ जून रोजी इस्रायलने इराणवर हल्ला केला. इराणच्या अणु तळांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. याच्या प्रत्युत्तरात इराणनेही इस्रायलच्या तेल अवीव शहरांवर हल्ला केला. यानंतर इस्रायलने इराणच्या राजधानीवर हल्ला करण्याची धमकी दिली आणि त्याच रात्री शनिवारी तेहरानवर तीव्र हल्ले केले. यामुळे इराणने देखील संतप्त होत इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली. सध्या हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याच वेळी या संघर्षावर विविध देशांच्या राष्ट्र नेत्यांकडूनही प्रतिक्रिया आहे. कोणी इस्रायला समर्थने दिले तर कोणी इराणला, तर कोणी दोन्ही देशांना शांततेने संघर्ष सोडवण्याचे आव्हान केले. याचे वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. शुक्रवारी इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले. यामध्ये इराणचे वरिष्ठ कमांडर आणि वैज्ञानिकांचा मृत्यू झाला. यानंतर पाकिस्तानचे शहबाज शरीफ यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
शहबाज शरीफ यांनी इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी सोशल मीडियावर यासंबंधी एक पोस्ट केली. परंतु या पोस्टमध्ये त्यांनी चुकून I Condemen च्या ऐवजी I Condom लिहिले, ज्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अमानूषतेचा कळस! बंद खोलीत डांबून अंदाधूंद गोळीबार, नायजेरियात शेकडोंच्या मृत्यूच्या किंकळ्या
@1spacerecorder या अकाऊंटवर एक पोस्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी इराणच्या समर्थनार्थ ‘निंदा’ ऐवजी चुकून ‘कंडोम’ लिहिले. नंतर, त्यांनी ते दुरुस्त केले. या मुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली होती. यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना ट्रोल केले जाऊ लागले. अनेकांनी याला टायपो म्हटले आहे. यावर वेगवेगळे मीम्स देखील शेअर करण्यात आले आहेत.
‘I Condom’
Pakistan’s Prime Minister mistakenly wrote ‘condom’ instead of ‘condemn’ in the support of Iran.
Later, he rectified it. pic.twitter.com/5DGiv9qZql— Space Recorder (@1spacerecorder) June 13, 2025
याबद्दल रेडिओ पाकिस्तान आणि द एक्सप्रेस ट्रिब्यूनने Condemen या शब्दाच्या वापराची पुष्टी केली आहे. Condom हा शब्द वापरण्यात आल्याची कोणतीही पुष्टी झालेली नाही. व्हायरल होत असलेली पोस्ट एआय जनरेटेड असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शाहबाज यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, इराणवर विनाकारण केलेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल मी इराणी जनतेप्रती कीव्र सहानुभूती व्यक्त करतो. इस्रायलचे कृत्य गंभीर आणि बेजबाबदार आहे. आधीच मध्य पूर्वेत अशांतात पसरलेली आहे, तरीही इस्रायल आणखी अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
तसेच शाहबाज यांनी आंतरराष्ट्रीय समुदायकडे आणि संयुक्त राष्ट्रांकडे प्रादेशिक आणि जागतिक शांततेला धोक्यात आणणाऱ्या तणावाला रोखण्याचे आवाहन केले आहे.
I condemn, in the strongest possible terms, today’s unprovoked attack on Iran by Israel. I convey my deepest sympathies to the Iranian people on the loss of lives in this attack. This grave and highly irresponsible act is deeply alarming and risks further de-stabilising an…
— Shehbaz Sharif (@CMShehbaz) June 13, 2025