रक्तरंजित व विध्वंसक युद्धाला लोक कंटाळाले; हमासविरोधात गाझामध्ये पहिल्यांदाच निदर्शने (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel-Hamas War: सध्या गाझात इस्त्रायलचे हल्ले सुरु आहेत. हमासने इस्त्रायलच्या युद्धबंदीच्या अटी मान्य न केल्याने पुन्हा एकदा गाझात नरसंहार सुरु झाला. दरम्यान गाझात पहिल्यांदाच हमासविरोधी निदर्शन सुरु झाली आहे. मंगळवारी (25 मार्च) हजारो लोक हमासविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. लोकांनी हमासला दहशतवादी संघटना म्हटले आहे. त्यांना सत्ता सोडण्याची मागणी केला आहे.
अनेक लोक युद्धाला कंटाळले असून हमास बाहेर पडा, हमास दहशतवादी आहेत, “आम्हाला हमासला उखडून टाकायचे आहेत अशी घोषणाबाजी सुरु केली आहे. युद्ध संपवा, आम्हाला आणि आमच्या मुलाना पॅलेस्टाईनमध्ये सुखरुप राहूद्या असे पोस्टर्स घेउन लोक रस्त्यावर उतरले आहेत. हमासच्या सैनिकांनीही निदर्शकांवर हल्ला केला आहे. लोकांना मारहाण केली असून त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे. या निदर्शनांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
निदर्शकांनी कतार सरकारकडून मिळालेल्या निधीतून एका वृत्तसंस्थेला लक्ष्य केले. हमास विरोधकांनी सोशल मीडियावर लोकांनी निदर्शनांमध्ये सामील होण्याचा आवाहन केले. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, आम्हाला माहित नाही की, निषेध कोणी आयोजित केला आहे, मी फक्त युद्धाला कंटाळलो आहे आणि म्हणून यामध्ये भाग घेतला आहे.
आणखी एका निदर्शकाने, लोक माध्यमांना या घटनांचे वृत्तांकन करण्याची मागणी करत आहे. पॅलेस्टिनी नागरिकांनी स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. गाझाविरुद्ध शत्रुत्व संपवण्याची मागणी आहेत. शांतता आणि युद्धाचा अंत व्हावा असा या निदर्शनाचा उद्देश आहे.
हमास समर्थकांनी या निदर्शकांकडे लक्ष देऊ नका असे आवाहन केले आहे. त्यांनी निदर्शनांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना देशद्रोही म्हणून संबोधले आहे.
JUST IN: Anti-Hamas protesters in Gaza are chanting: “Hamas is a terrorist!”. pic.twitter.com/iinxFy1kk4
— Ihab Hassan (@IhabHassane) March 25, 2025
इस्त्रायलसोबतच्या युद्धामुळे हमासविरोधी टीकाकारांच्या संख्येत वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांना विरोध केला जात आहे. गाझा युद्धामुळे अनेक लोकांची परिस्थिती बिकट बनली आहे. यामुळे अनेकजण युद्धबंदीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत.