ख्रिश्चनांचे सर्वोच्च नेते पोप फ्रान्सिस (pope francis) यांच नाव सध्या चर्चेत आहे. पोप फ्रान्सिस यांनी एका महिलेवर आशीर्वाद मागितल्यावर त्यांना राग आल्याचा किस्सा सांगितला आहे. त्यावेळी त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी तिला रागवल्याचे त्यांनी सांगितले. पाळीव प्राण्यांबद्दल लोकांची वाढती आपुलकी आणि आवड यांच्याशी संबंधित हे प्रकरण आहे. पोप म्हणाले की, आता केवळ इटलीतील श्रीमंत लोकच मुले जन्माला घालू शकतात. पोप का बरं असे म्हणाले? नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.
[read_also content=”दिलासादायक! कोरोना रुग्णवाढीत किंचित घट, गेल्या 24 तासात 1,272 कोरोना रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णांची संख्या 15,515, वर https://www.navarashtra.com/latest-news/1272-corona-patients-reported-in-last-24-hours-in-india-number-of-active-patients-15515-nrps-399172.html”]
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एक महिला पोप फ्रान्सिस यांच्याकडे आर्शिवाद घेण्यासाठी गेली होती. तिने पोपला ‘माझ्या मुलाला आशीर्वाद द्या’ असं म्हण्टलं. जो एक कुत्रा होता. पोप म्हणाले, ‘मी माझा संयम गमावला आणि त्याला म्हणालो, इतकी मुले आहेत जी भुकेली आहेत आणि तू माझ्याकडे एक कुत्र घेऊन आली आहेस?’ त्यांच्या प्रतिक्रियेनंतंर इटलीमधील मुलांचा घटता जन्मदर हा विषय आता चर्चेत आला आहे.
घटत्या जन्मदरावर चिंता व्यक्त केली पोप यांनी इशारा दिला की ‘असंस्कृत’ मुक्त बाजार तरुणांना मुले होण्यापासून रोखत आहे. इटलीमधील जन्मदर 2022 मध्ये प्रथमच 400,000 च्या खाली गेला आहे. गेल्या काही वर्षातील ही सलग 14वी वार्षिक घट नोंदवली गेली आहे. लोकसंख्येत 179,000 इतकी घसरण झाल्यानंतर देशाची एकूण लोकसंख्या 5.88 कोटी झाली आहे. वाढत्या लोकसंख्याशास्त्रीय संकटावरील एका परिषदेत ते म्हणाले की, घटत्या जन्मदराने भविष्यात आशेची कमतरता दिसुन येत आहे. यावरून तरुण पिढी अनिश्चिततेच्या भावनेने दबलेली असल्याचे दिसून येत आहे, असेही ते म्हणाले.
इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत बोलताना पोप म्हणाले की, तरुण पिढी अनिश्चिततेच्या गर्तेत जाण्यामागे अनेक कारण आहेत. ‘स्थायी नोकरी शोधण्यात अडचण, खूप महाग घरे, गगनाला भिडणारे भाडे आणि अपुरे वेतन या खऱ्या समस्या आहेत. आवश्यक सुधारात्मक उपायांशिवाय मुक्त बाजारपेठ अनियंत्रित होते आणि वाढत्या परिस्थिती असमानता निर्माण करते.