भारतीय वंशांच्या पंतप्रधान कमला प्रसाद-बिस्सेसर आणि राष्ट्राध्यक्षा क्रिस्टीन कार्ला कांगालु (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या विदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील, नामिबियाला भेट देणार आहेत. पहिली भेट पंतप्रधान मोदी घानाला देतील. पण एक असा देश आहे जिथे भारतीय वंशाच्या नेत्यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सभापती ही तिन्ही महत्वाची पदे भारतीय वंशांच्या लोकांकडे आहेत. यातील राष्ट्रपती आणि पंतप्रधान पदावर महिलांचे प्रभूत्व आहे.
तर मिळालेल्या माहितीनुसार, त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशात राजकीय क्षेत्रात भारतीय लोकांना मोठा मान दिला जातो. घानाला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी दोन दिवस त्रिनिदाद आणि टोबॅगो च्या दौऱ्यावर असणारा आहेत. त्त्रिनिदाद आणि टोबॅगोला १९९९ नंतर भारतीय पंतप्रधानांचा हा त्रिनिदाद आणि टोबॅगोला पहिला दौरा असणार आहे.
हा दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विकसनशील देशांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यावर या दौऱ्यात चर्चा होणार आहेत. भारताचे त्रिनिदाद आणि टोबॅगोशी संबंध गेल्या अनेक वर्षांपासून दृढ आहेत. या देशात ४२ टक्क्याहून अधिक भारतीय वंशाचे लोक राहतात.
या देशाची लोकसंख्यां १५ लाकोंपेक्षा जास्त आहे. या छोट्या देशात राष्ट्रपती आणि पंतप्रधान ही दोव्ही महत्त्वाची पदे भारतीय वंशाच्या महिला नेत्यांनी भूषवली आहे. यामुळेच महिला पंतप्रधान कमला प्रसाद बिस्सेसर यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान मोदी त्रिनिदादच्या दौऱ्यावर जात आहेत.
तसेच त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या राष्ट्राध्यक्षा क्रिस्टीन कार्ला कांगालु या भारतीय वंशाच्या नेत्या आणि वकील आहेत. त्या देशाच्या ७ व्या राष्ट्रपती आहेत. २०२३ पासून त्या या पदावर आहेत. यापूर्वी त्यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या सिनेटचे पद भूषवलले आहे. २००१ मध्ये त्यांनी राजकारणात प्रेवश केला होता. २० मार्च २०२३ रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगोचे अध्यक्षपद क्रिस्टीन यांनी स्वीकारले होते. त्या या देशाच्या दुसऱ्या महिला नेता आहेत. क्रिस्टिनी कार्ला कांगालु यांनी २०२८ मध्ये त्यांच्या पतीसह ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
कमला प्रसाद-बिस्सेसर यांनी १ मे २०२५ रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान पद स्वीकारले. त्यांचे पूर्ण नाव कमला सुशीला प्रसाग बिस्सेसर आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी वकिली केली होती. कमला प्रसाद या दोन वेळ त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान पदी निवडून आल्या आहेत. यापूर्वी त्यांनी २०१० मध्ये देखील या देशाचे पंतप्रधान पद भूषवले होते. या दोन्ही महिला नेत्यांची गणना देशातीव सर्वोच्च नेत्यांमध्ये केली जात.