ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. लंडनमधील किंग जॉर्ज चतुर्थ मेमोरियल चॅपलमध्ये त्यांच्यावर अंत्यविधी पार पडणार. महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख, राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती दौपदी मुर्मसुद्धा (Draupadi Murmu) त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.
[read_also content=”आता बोला! मुंबईत महिला खेळाडूंना शौचालय नाहीत ही दुर्देवी बाब – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर https://www.navarashtra.com/maharashtra/it-is-unfortunate-that-there-are-no-toilets-for-women-players-in-mumbai-says-union-minister-anurag-thakur-nrvb-327444.html”]
यापुर्वी वेस्टमिन्स्टर हॉल येथे (Westminster Hall) महाराणी एलिझाबेथ याचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होत. यावेळी देशविदेशातील अनेत दिग्गजांनी त्यांचं अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहीली होती. महाराणी एलिझाबेथ 8 सप्टेंबर रोजी निधन झालं. आज तब्बल दहा दिवसानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाराणी एलिझाबेथ यांना त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्या शेजारील समाधीमध्ये दफन करण्यात येणार आहे.
[read_also content=”सोनाली फोगट हत्येचा तपास करण्यासाठी सीबीआय रिसॉर्टमध्ये दाखल, कर्मचाऱ्यांचे जबाबही नोंदवले https://www.navarashtra.com/india/sonali-phogat-murdered-tapas-karanyasathi-cbi-resort-middle-entry-employees-response-nondavale-nrps-327235.html”]